​उत्कर्ष शर्माच्या ‘जीनिअस’चे फर्स्ट पोस्टर आऊट!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2018 07:15 AM2018-02-26T07:15:27+5:302018-02-26T12:45:27+5:30

‘गदर- एक प्रेमकथा’  आणि ‘अपने’ यासारखे सुपरहिट चित्रपट दिग्दर्शित करणारे अनिल शर्मा यांचा मुलगा उत्कर्ष शर्मा बॉलिवूड डेब्यूसाठी तयार ...

First poster of Uttrash Sharma's Genius! | ​उत्कर्ष शर्माच्या ‘जीनिअस’चे फर्स्ट पोस्टर आऊट!

​उत्कर्ष शर्माच्या ‘जीनिअस’चे फर्स्ट पोस्टर आऊट!

googlenewsNext
दर- एक प्रेमकथा’  आणि ‘अपने’ यासारखे सुपरहिट चित्रपट दिग्दर्शित करणारे अनिल शर्मा यांचा मुलगा उत्कर्ष शर्मा बॉलिवूड डेब्यूसाठी तयार आहे. केवळ तयारच नाही तर त्याच्या डेब्यू सिनेमा ‘जीनिअस’चे पहिले पोस्टरही लॉन्च झाले आहे. ‘गदर’ या चित्रपटात उत्कर्षने सनी देओलच्या मुलाची भूमिका साकारली होती. आता उत्कर्ष लीड हिरो म्हणून बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतोय.
उत्कर्ष शर्माला आपल्या आशीर्वादाची गरज आहे. ‘जीनिअस’सोबत तो येत्या २४ आॅगस्टला स्क्रीनवर येतो आहे. ‘दिल की लडाई दिमाग से’, असे टिष्ट्वट करत, अनिल शर्मा यांनी ‘जीनिअस’चे पोस्टर जारी केले. या पोस्टरमध्ये उत्कर्ष कमालीचा स्टाईलिश दिसतो  आहे.



अनिल शर्मा केवळ आपल्या मुलालाच नाही तर एका नव्या हिरोईनलाही या चित्रपटाद्वारे लॉन्च करणार आहेत.  आहेत. या हिरोईनचे नाव आहे इशिता. अनिल शर्माच्या या चित्रपटात आयशा जुल्का, मिथुन चक्रवर्ती, नवाजुद्दीन सिद्दीकी हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत.  स्लिप डिस्कच्या समस्येचा सामना करणारी आयशा जुल्का सुमारे सात वर्षांनंतर या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर परतणार आहे. ‘जीनिअस’ हा एक सायन्स फिक्शन आहे. एक तरूण आपल्या प्रयोगाने जग बदलतो, असे कथानक यात दिसणार आहे.  

ALSO READ : होय, ‘जो जीता वही सिकंदर’ची ‘अंजली’ परततेयं...बनणार ‘आई’!!

अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेल स्टारर ‘गदर : एक प्रेमकथा’ या चित्रपटाला आज १६ वर्षे पूर्ण झाली आहेत. १५ जून २००१ रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाने त्यावेळी तब्बल ७७ कोटी रुपयांची कमाई केली होती. चित्रपटाच्या लाइफ टाइम कलेक्शनविषयी बोलायचे झाल्यास या चित्रपटाने तब्बल ४०० कोटी रुपयांची कमाई केली होती.  

Web Title: First poster of Uttrash Sharma's Genius!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.