एनटीआर बायोपिकमधील पहिले गाणे 'कथा नायका' प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 07:05 PM2018-12-03T19:05:18+5:302018-12-03T19:05:57+5:30
एन.टी.आर. बायोपिकमधील 'कथा नायका' गाणे नुकतेच दाखल झाले आहे.
सुपरस्टार एन.टी.रामाराव यांच्या आयुष्यावर आधारीत बायोपिक बऱ्याच दिवसापासून चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये विद्या बालन, राणा दुग्गाबत्ती व सुमंथा हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. त्यामुळे या चित्रपटाबाबतची प्रेक्षकांमधील उत्सुकता आणखीन वाढली आहे. या चित्रपटातील पहिले गाणे नुकतेच दाखल झाले आहे. 'कथा नायका' असे या गाण्याचे नाव असून या गाण्याला प्रसिद्ध गायक कैलाश खेरने स्वरसाज दिला आहे.
एन.टी.आर. बायोपिकमधील 'कथा नायका' गाणे शिवाशक्ती दत्ता आणि डॉ.के.रामकृष्ण यांच्या लेखणीतून साकार झाले आहे. या गाण्याला संगीत एम.एम. किरवानी यांनी दिले आहे. बालकृष्ण दिग्दर्शित हा चित्रपट तेलुगू, तमिळ आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यामध्ये राणा दग्गुबती आणि सुमंथा यांची प्रमुख भूमिका आहे असून विद्या बालन एनटीआर यांच्या पत्नीची भूमिका साकारणार आहे. तर बंगाली चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय चेहरा जिसूसुद्धा या चित्रपटातून झळकणार आहे. ज्याच्या खांद्यावर दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्या एल.व्ही. प्रसाद यांची व्यक्तीरेखा साकारण्याची जबाबदारी असणार आहे.
दरम्यान,एनटीआर बायोपिक हा दोन भागात प्रेक्षकांना प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. पहिल्या भागाचे शीर्षक ‘कथानायकुडू’ असून दुसऱ्या भागाचे ‘महानायकुडू’ असे शीर्षक आहे. पहिला भाग ९ जानेवारीला प्रदर्शित होणार असून दुसरा २६ जानेवारी २०२० ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.