‘संजू’चे पहिले गाणे ‘मैं बढिया, तू भी बढिया...’ रिलीज!!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2018 06:37 AM2018-06-03T06:37:39+5:302018-06-03T12:07:39+5:30
संजय दत्तचे बायोपिक ‘संजू’चे पहिले ह गाणे काही क्षणांपूर्वी रिलीज झाले. टी-सीरिजच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हे गाणे रिलीज करण्यात आले आहे.
स जय दत्तचे बायोपिक ‘संजू’चे पहिले ह गाणे काही क्षणांपूर्वी रिलीज झाले. टी-सीरिजच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हे गाणे रिलीज करण्यात आले आहे. ‘मैं बढिया, तू भी बढिया...’ असे या गाण्याचे बोल आहेत. सोनू निगम आणि सुनिधी चौहान यांच्या आवाजातील या गाण्याची सुरुवात होते ती एका संवादाने. ‘पापा को लगता है मै गाने के साथ लिप मॅच नहीं कर सकता.ही इज राँग, वॉच मी,’ असा संवाद ऐकू येतो आणि हे गाणे सुरू होते. संजय दत्त बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार होता. तेव्हा त्याचे वडील सुनील दत्त यांना वाटायचे की, संजय गाण्यासोबत लिप मॅच करू शकत नाही. हीच या गाण्याची थीम आहे. दोन मिनिटांच्या या गाण्यात सोनम कपूरचीही एन्ट्री दाखवली गेली आहे़. सोनम कपूरही मेल वॉईसमध्ये लिप सिकिंग करताना दिसतेय. गाण्यात सोनम कपूर व रणबीर कपूर एकदम जॉली मूडमध्ये दिसताहेत. त्यांचा रेट्रो लूकही पाहण्यासारखा आहे.
काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांनी एक फोटो शेअर करत हुक लाईनची एक झलक दाखवली होती. ‘मैं बढिया,तू भी बढिया...’ असे त्यांनी लिहिले होते.
ALSO READ :मैं बेवड़ा हूं, ठरकी हूं... लेकिन टेररिस्ट नहीं! ‘संजू’चा बहुप्रतिक्षीत ट्रेलर रिलीज, पाहून व्हाल खल्लास!!
रणबीर कपूरची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट येत्या २९ जूनला प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. संजय दत्तचे नशेच्या आहारी गेल्यानंतरचे आयुष्य, कारागृहातील दिवस, नातेवाइकांचा अबोला, दहशतवादी अशा काही घटना या चित्रपटात दाखविल्या जातील, ज्या तुम्हाला विचार करण्यास भाग पाडतील. या बायोपिकमध्ये अभिनेता रणबीर कपूर, मनीषा कोइराला, परेश रावल, अनुष्का शर्मा, दिया मिर्झा आणि सोनम कपूर आदी कलाकार आहेत.