आधी विकी कौशलला बाजुला केलं, मग सलमानने असा मिटवला वाद; व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2023 05:24 PM2023-05-27T17:24:18+5:302023-05-27T17:25:55+5:30

सलमान आणि विकी कौशलचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर सलमान खानला ट्रोल करण्यात येत आहे

First Vicky Kaushal sidelined, Salman Khan settled the dispute; The video went viral | आधी विकी कौशलला बाजुला केलं, मग सलमानने असा मिटवला वाद; व्हिडिओ व्हायरल

आधी विकी कौशलला बाजुला केलं, मग सलमानने असा मिटवला वाद; व्हिडिओ व्हायरल

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यानंतर आता त्याच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सलमानच्या सुरक्षा ताफ्यात कडकोट बंदोबस्त तैनात असतो. सलमानचा बॉडिगार्ड शेरा त्याची काळजी घेतो, तर इतरही बॉडिगार्ड भाईजानचं कवच बनून त्याच्यासोबत असतात. सध्या सलमान आयफा अवॉर्ड २०२३ साठी अबू धाबी येथे आहे. या सोहळ्यातील एंट्रीचा सलमानचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये, सलमानच्या बॉडीगार्डकडून अभिनेता विकी कौशलला धक्का देत बाजुला सारण्यात आलंय. 

सलमान आणि विकी कौशलचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर सलमान खानला ट्रोल करण्यात येत आहे. मात्र, सलमानने हा वाद वाढल्यानंतर ग्रीन कार्पेटवर विकीला जादू की झप्पी देत हा वाद मिटवला आहे. त्यामुळे, आता सलमानने विकीला मिठी मारल्याचाही व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तर, विकी कौशलनेही या वादावर पडदा टाकलाय.


विकीने पीटीआयशी बोलताना म्हटले की, अनेकवेळा जे दिसतं ते नसतं, विनाकारण एखादी गोष्ट वादग्रस्त करुन वाढवली जाते. जसं की आता काही गोष्टींवरुन फिजूलची चर्चा सुरू आहे. मात्र, व्हिडिओत जसं दिसतंय, तसं काहीही नाही. या गोष्टीवर बोलण्यात काहीच अर्थ नाही, असे विकी कौशलने मीडियाशी बोलताना म्हटले. 

सोशल मीडियावर पहिल्यांदा सलमानच्या एंट्रीवेळी बॉडीगार्डने विकी कौशलला बाजूला केल्याचं दिसून आलं. त्यामुळे, दोन्ही सेलिब्रिटींमध्ये काही बिनसलं का, अशी चर्चाही रंगली. मात्र, काही वेळातच सलमानने स्वत: पुढे येत विकी कौशलला मिठी मारली. त्यामुळे या वादावर पडदा पडला. सलमानच्या या कृतीचं आता कौतुक होत असून चाहत्यांकडून भाईजानचं समर्थन केलं जातंय. 

Web Title: First Vicky Kaushal sidelined, Salman Khan settled the dispute; The video went viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.