Flashback 2019 : अचानक म्हातारे झाले बॉलिवूडचे हे सेलेब्स, दिसू लागले होते असे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2019 06:00 AM2019-12-29T06:00:00+5:302019-12-29T06:00:00+5:30
बॉलिवूडचे काही सेलिब्रेटी अचानक झाले म्हातारे, पहा त्यांचे फोटो
सोशल मीडियावरील ट्रेंड्स फॉलो करण्यामध्ये बॉलिवूडचे सेलिब्रेटीदेखील अग्रेसर आहेत. २०१९मध्ये म्हातारा लूकचा ट्रेंड आला होता. फेस अॅपच्या मदतीने लोक आपण उतारवयात कसे दिसणार आहोत, हे पाहत होते आणि इतकेच नाही तर फोटो सोशल मीडियावर शेअर करत होते. सामन्य लोकांप्रमाणे बॉलिवूडचे सेलेब्सनेदेखील या ट्रेंडमध्ये इंटरेस्ट घेतला होता. कलाकारांनी स्वतःचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंमध्ये ते वयाच्या ६० ते ८० वर्षी कसे दिसणार आहेत. सोशल मीडियावर त्यांचे फोटो व्हायरल झाले होते.
या वर्षखेरीस कोणकोणत्या सेलिब्रेटींनी फेस अॅपच्या मदतीने झाले होते वयस्कर, पाहुयात त्यांचे फोटो
शाहीद कपूर
शाहीद कपूरने देखील सोशल मीडियावर त्याचा वयस्कर लूक शेअर केला होता. या फोटोत तो वयस्कर दिसत होता मात्र त्याचा चॉकलेटी फेस जास्त अॅट्रॅक्टिव्ह वाटत होता. फोटोमध्ये त्याचे ग्रेस केस व थोडीशी दाढी व मूछमध्ये स्ट्रीक्ट लूक पहायला मिळाला होता.
बॉलिवूडचा हॅण्डसम हंक रणबीर कपूरने फेस अॅपने म्हातारा लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोत वयस्कर लूकमधील रणबीर कपूर ब्लॅक फुल टीशर्ट व टोपीमध्ये दिसला होता. त्याच्या चाहत्यांनी या फोटोवर खूप कमेंट्स केल्या होत्या.
कमी कालावधीत आपल्या अभिनय कौशल्यानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता रणवीर सिंगदेखील या ट्रेंडचा हिस्सा बनला होता. रणवीरने दीपिका पादुकोणसोबतचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोत ते दोघे वयस्कर अंदाजात दिसत होते मात्र क्यूट दिसत होते.
सोनम कपूर
अभिनेत्री सोनम कपूरने फेस अॅपच्या मदतीने वयस्कर लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. या फोटोत ती खूपच म्हातारी दिसत होती.
वरूण धवन
अभिनेता वरूण धवनने म्हाताऱ्या लूकमधील फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता. या फोटोत वरूणचा लूक पाहून अनिल कपूरसारखा दिसत होता. त्याने स्वतः कॅप्शनमध्ये लिहिलं होतं.