फ्लॉप फिल्मी करिअरमुळे ‘ही’ अभिनेत्री बनली पोकर प्लेयर!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2017 10:25 AM2017-06-29T10:25:41+5:302017-06-29T15:58:14+5:30

बॉलिवूड अभिनेत्री मनीषा लाम्बा बºयाचशा काळापासून बॉलिवूडमधून गायब आहे. २००५ मध्ये ‘यहां’ या चित्रपटातून आपल्या बॉलिवूड करिअरला सुरुवात करणाºया ...

Flop Film career made 'actress' poker player! | फ्लॉप फिल्मी करिअरमुळे ‘ही’ अभिनेत्री बनली पोकर प्लेयर!

फ्लॉप फिल्मी करिअरमुळे ‘ही’ अभिनेत्री बनली पोकर प्लेयर!

googlenewsNext
लिवूड अभिनेत्री मनीषा लाम्बा बºयाचशा काळापासून बॉलिवूडमधून गायब आहे. २००५ मध्ये ‘यहां’ या चित्रपटातून आपल्या बॉलिवूड करिअरला सुरुवात करणाºया मनीषाने ‘कॉर्पोरेट’, ‘हनिमून ट्रॅव्हल्स प्रायव्हेट लिमिटेड’, ‘दस कहानियॉ’ आदी चित्रपटांमध्ये काम केले. २००८ मध्ये तर तिला ‘बचना ए हसीनों’ या चित्रपटाने ओळखही निर्माण करून दिली. परंतु बॅक टू बॅक हिट चित्रपट देणे अशक्य होऊ लागल्याने तिच्या करिअरचा ग्राफ फ्लॉप ठरू लागला. त्यामुळे तिने हे क्षेत्र सोडून ‘जुगार’ क्षेत्राला आधार बनविले. आज ती भारताची पहिली प्रोफेशनल पोकर प्लेयर सेलिब्रिटी बनली आहे. 



मनीषाने फ्लॉप ठरू लागलेल्या फिल्मी करिअरमुळे लॉस वेगास येथे पोकर खेळण्यास (एकप्रकारचा जुगार) सुरुवात केली. सात वर्ष पोकर खेळल्यानंतर ती सध्या प्रोफेशन पोकर प्लेयर बनली आहे. त्याचबरोबर पहिली सेलिब्रिटी पोकर प्लेयर म्हणूनही तिच्याकडे बघितले जात आहे. मनीषाची Adda52.com या पोकर वेबसाइटला सर्व टूर्नामेंटनी साइन केले आहे. तिने आतापर्यंत लास वेगासमध्ये डब्ल्यूपीटी ५०० एरिया पोकर टुर्नामेंट, इंडियन पोकर चॅम्पियनशिप, हेल्टिन पोकर आणि गोव्यात झालेल्या कित्येक पोकर टूर्नामेंट्समध्ये सहभाग नोंदविला आहे. 



१८ जानेवारी १९८५ मध्ये नवी दिल्ली येथे जन्मलेली मनीषा एका हरियाणवी जाट परिवारातील आहे. तिच्या वडिलांचे नाव केवळ आणि आईचे नाव मंजू लाम्बा आहे. तिला एक लहान भाऊ असून, त्याचे नाव करण लाम्बा आहे. मनीषाने चेन्नई येथील चेत्तीनाद विद्याश्रम स्कूल आणि मिरांडा हाउस युनिव्हर्सिटी, दिल्ली येथून आपले शिक्षण पूर्ण केले. मनीषाचे बॉलिवूड करिअर फ्लॉप ठरत असतानाच तिने बॉयफ्रेंड रियान थाम याच्याशी लग्न केले. मनीषा आणि रियानची भेट २०१३ साली त्यांच्या एका कॉमन मित्राच्या माध्यमातून झाली. वृत्तानुसार पहिल्याच भेटीत त्यांच्यात प्रेम झाले होते. पुढे ते दोघे बºयाचदा पार्ट्यांमध्ये बघावयास मिळाले. दोन वर्ष नात्यात राहिल्यानंतर २०१४ मध्ये त्यांनी लग्न केले. 



मनीषाने बिग बॉस-८ मध्येही सहभाग नोंदविला होता. त्यावेळी तिचे आर्या बब्बरसोबत असलेल्या नात्याविषयीचे गुपित उघड झाले होते. याचवेळी अशीही बातमी आली होती की, आर्या आणि मनीषा यांना एका विशेष प्लॅनकरिता घरात पाठविण्यात आले होते. त्यातूनच त्यांनी त्यांच्यातील मतभेद दूर केले. मनीषा जेव्हा घराबाहेर पडली होती तेव्हा तिने आर्याविषयी तिच्या मनात कुठलेच मतभेद नसल्याचे स्पष्ट केले होते. मनीषाच्या बॉलिवूड करिअरची सुरुवात शिक्षण घेताना सुरू झाली होती. मनीषा जेव्हा दिल्लीच्या युनिव्हर्सिटीत शिक्षण घेत होती, तेव्हाच तिने मॉडलिंगला सुरुवात केली होती. त्यावेळी तिने अनेक ब्रॅण्डसाठी मॉडलिंग केले होते. 



सध्या मनीषा पोकर प्लेयर म्हणून आनंदाने जीवन जगत असून, या क्षेत्रात ती स्वत:ची ओळख निर्माण करीत आहे. त्यामुळे ती आता पुन्हा बॉलिवूडमध्ये परतणार काय? याविषयी शंका आहे. दरम्यान मनीषाच्या चाहत्यांची तिने पुन्हा बॉलिवूडमध्ये परतावे अशीच इच्छा असेल. 

Web Title: Flop Film career made 'actress' poker player!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.