नताशासोबतच्या घटस्फोटानंतर हार्दिक पांड्या या अभिनेत्रीला करतोय फॉलो

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 04:10 PM2024-07-20T16:10:22+5:302024-07-20T16:11:11+5:30

Natasha Stankovic-Hardik Pandya : नताशा स्टॅन्कोविकपासून घटस्फोट घेतल्यानंतर हार्दिक पांड्या आणि या बॉलिवूड अभिनेत्रीने एकमेकांना इन्स्टाग्रामवर फॉलो करण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे ते आता सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत.

Following his divorce with Natasha, Hardik Pandya is following the actress | नताशासोबतच्या घटस्फोटानंतर हार्दिक पांड्या या अभिनेत्रीला करतोय फॉलो

नताशासोबतच्या घटस्फोटानंतर हार्दिक पांड्या या अभिनेत्रीला करतोय फॉलो

नताशा स्टॅन्कोविक (Natasha Stankovic) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्यांमुळे बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहेत. पण आता अखेर घोषणा करून दोघांनीही त्यांच्या नात्यात काहीच उरले नसल्याचे सिद्ध केले आहे. दरम्यान, हार्दिक पांड्याने २५ वर्षीय अभिनेत्रीला इन्स्टावर फॉलो केले आहे.

नताशा स्टॅन्कोविकपासून घटस्फोट घेतल्यानंतर हार्दिक पांड्या आणि या बॉलिवूड अभिनेत्रीने एकमेकांना इन्स्टाग्रामवर फॉलो करण्यास सुरुवात केली आहे, ज्यामुळे ते आता सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. नताशा स्टॅन्कोविचसोबत घटस्फोट घेतल्याची घोषणा केल्यानंतर हार्दिक पांड्या या अभिनेत्रीला इन्स्टावर फॉलो करत असल्याची बातमी ऐकून चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला आहे. या अभिनेत्रीचे नाव ऐकून तुमचाही विश्वास बसणार नाही.

जाणून घ्या कोण आहे ती अभिनेत्री?
नताशा स्टॅन्कोविचसोबत विभक्त झाल्याची घोषणा केल्यापासून क्रिकेटर हार्दिक पांड्या चर्चेत आहे. आता त्याने २५ वर्षीय अभिनेत्रीला सोशल मीडिया इंस्टाग्रामवर फॉलो केले आहे. या अभिनेत्रीनेही क्रिकेटरला फॉलो केले आहे, ती दुसरी कोणी नसून बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे आहे. अनन्या आणि हार्दिकने इंस्टाग्रामवर एकमेकांना फॉलो करताच ते सोशल मीडियावर चर्चेत आले.

ही अभिनेत्री एकेकाळी आदित्यसोबत होती रिलेशनशिपमध्ये
अनन्या पांडेबद्दल बोलायचे झाले तर काही काळापूर्वी या अभिनेत्रीचे नाव अभिनेता आदित्य रॉय कपूरसोबत जोडले गेले होते. दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले होते. दोघेही काही काळ डेट करत होते. पण अनन्या आणि आदित्यने कधीच पुढे येऊन त्यांच्या नात्याचा स्वीकार केला नाही. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नातील हार्दिक पांड्या आणि अनन्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, लग्नात दोघांनीही जोरदार डान्स केला होता.

Web Title: Following his divorce with Natasha, Hardik Pandya is following the actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.