'सिंबा'साठी रणवीर आणि साराने या मराठमोळ्या अभिनेत्रीकडून गिरविले होते मराठीचे धडे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 05:17 PM2022-12-17T17:17:20+5:302022-12-17T17:18:08+5:30

सिंबा चित्रपटाचा दिग्दर्शक रोहित शेट्टीने मराठमोळ्या या अभिनेत्रीचे एका शोमध्ये मानले आभार

For Simmba, Ranveer and Sara took Marathi lessons from this Marathi actress | 'सिंबा'साठी रणवीर आणि साराने या मराठमोळ्या अभिनेत्रीकडून गिरविले होते मराठीचे धडे

'सिंबा'साठी रणवीर आणि साराने या मराठमोळ्या अभिनेत्रीकडून गिरविले होते मराठीचे धडे

googlenewsNext

द कपिल शर्मा शोचा या वीकएंडचा भाग धमाल मस्तीने भरलेला असणार आहे, कारण सर्कस चित्रपटातील रणवीर सिंग, जॅकलीन फर्नांडिस, पूजा हेगडे, वरुण शर्मा, अश्विनी काळसेकर, सुलभा आर्या, व्रजेश हिरजी, अनिल चरणजीत, विजय पाटकर, सिद्धार्थ जाधव, टिकू टलसानिया आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी वगैरे कलाकारांची रंगीत आणि उत्साहाने सळसळणारी टीम या भागात उपस्थित राहून आपल्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसणार आहे. कार्यक्रमाची रंजकता वाढवत ‘सर्कस’ची टीम आपल्या गमती-जमतींनी सर्वांचे मनोरंजन करताना तसेच या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान आलेले अनुभव शेअर करताना आणि काही मजेदार किस्से सांगताना दिसणार आहे.
 
सिम्बा चित्रपटाच्या वेळेस केलेल्या साहाय्याबद्दल अश्विनी काळसेकरबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टी म्हणाला, सिम्बा चित्रपटात रणवीर सिंग आणि सारा अली खान साकारत असलेली पात्रे मराठी होती. अश्विनीची या चित्रपटात न्यायाधीशाची एक लहानशी भूमिका होती, पण तरीही संपूर्ण शूटिंग सुरू असेपर्यंत दोन्ही कलाकारांना मराठी उच्चरणात मदत करण्यासाठी ती आमच्यासोबत असायची. सेटवर ती जणू संवाद दिग्दर्शकच होती. म्हणजे ती अशी साहाय्यक होती, जिने संपूर्ण शूटिंग दरम्यान आमच्यासोबत काम केले.”


 यावर अश्विनी म्हणाली, सिम्बा चित्रपटासाठी काम करण्याची ही सुवर्णसंधी रोहित सरांनी मला दिल्याबद्दल मला खूप आनंद झाला.
 ‘सर्कस विशेष’ भाग द कपिल शर्मा शो मध्ये या शनिवारी आणि रविवारी रात्री 9:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर पाहायला मिळेल.

Web Title: For Simmba, Ranveer and Sara took Marathi lessons from this Marathi actress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.