Forbes India 2019:  ‘हा’ आहे यंदाचा सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड सुपरस्टार, सलमानला टाकले मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2019 11:09 AM2019-12-20T11:09:46+5:302019-12-20T11:18:44+5:30

सर्वाधिक कमाई करणा-या फोर्ब्स सेलिब्रिटींच्या यंदाची यादी जरा शॉकिंग आहे.

forbes india 2019 celebrity 100 akshay kumar topped this list | Forbes India 2019:  ‘हा’ आहे यंदाचा सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड सुपरस्टार, सलमानला टाकले मागे

Forbes India 2019:  ‘हा’ आहे यंदाचा सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड सुपरस्टार, सलमानला टाकले मागे

googlenewsNext

फोर्ब्स या अमेरिकन मासिकाने सालाबादप्रमाणे यंदाही टॉप 100 सेलिब्रिटींची यादी जारी केली. सर्वाधिक कमाई करणा-या फोर्ब्स सेलिब्रिटींच्या यंदाची यादी जरा शॉकिंग आहे. होय, तिन्ही खानांसह   बॉलिवूड कलाकारांना मागे टाकत .  भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने या यादीत अव्वल स्थान पटकावले आहे. आत्तापर्यंत या यादीत बहुतांशवेळा अव्वल स्थानावर राहणा-या सलमान खानला त्याने मागे टाकले आहे. त्यानेच नाही तर बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार यानेही भाईजानला मात दिली आहे.

होय, अक्षय कुमार या यादीत दुस-या स्थानावर आहे.  म्हणजेच, अक्षय कुमार यंदाचा सर्वाधिक कमाई करणारा बॉलिवूड स्टार स्टार आहे. भाईजानला तिस-या क्रमांकावर समाधान मानले आहे.

या यादीत अमिताभ बच्चन चौथ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी यंदा 239.25 कोटींची कमाई करत या यादीत चौथे स्थान पटकावले आहे.

2018 मध्ये प्रदर्शित करण्यात आलेल्या फोर्ब्सच्या टॉप 100 यादीत शाहरुखचे नाव टॉप 20 मध्ये होते. यंदा  शाहरुखने पहिल्या 10 च्या यादीत स्थान मिळवले आहे. त्याने यादीत सहावे स्थान पटकावले आहे.  

 संपूर्ण यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

रणवीर सिंगने या यादीत सातवे स्थान मिळवले आहे. त्याची कमाई 118.2 कोटीच्या घरात आहे.

आलिया भटने 59.21 कोटींची कमाई करत या यादीत आठवे स्थान मिळवले आहे.

दीपिकाने 48 कोटींच्या कमाईसह यादीत 10 वे स्थान मिळवले आहे.

अजय देवगन 12 वे स्थान (94 कोटी रुपये)  
 
 

आमिर खान 15 वे स्थान  
 

Web Title: forbes india 2019 celebrity 100 akshay kumar topped this list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.