फोर्स २ : आॅनलाईन लीक प्रकरणी वितरकांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2017 07:04 PM2017-01-15T19:04:23+5:302017-01-15T19:04:23+5:30

अभिनेता जॉन अब्राहम व सोनाक्षी सिन्हा यांचा ‘फोर्स २’ या चित्रपट मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात रिलीज झाला होता. बॉक्स ...

Force 2: Crime against Distributors in the online leak case | फोर्स २ : आॅनलाईन लीक प्रकरणी वितरकांवर गुन्हा

फोर्स २ : आॅनलाईन लीक प्रकरणी वितरकांवर गुन्हा

googlenewsNext
िनेता जॉन अब्राहम व सोनाक्षी सिन्हा यांचा ‘फोर्स २’ या चित्रपट मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात रिलीज झाला होता. बॉक्स आॅफिसवर या चित्रपटाला फारसे यश मिळू शकले नाही, प्रदर्शनाच्या वेळीच हा चित्रपट आॅनलाईन लीक झाला होता. याप्रकरणी निर्माता कंपनी वायाकॉम १८ ने  (५्रंूङ्मे18) के.सेरा.सेरा या कंपनीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. आॅनलाईन लीक झाल्यामुळे निर्मात्यांना मोठा तोटा सहन करावा लागला असल्याचा उल्लेख एफआयआरमध्ये करण्यात आला आहे.  

१८ नोव्हेंबरला रिलीज झालेल्या विपुल शाह निर्मित अभिनय देव दिग्दर्शित ‘फोर्स २’च्या निर्मितीमध्ये वायाकॉम १८ या कंपनीची भागीदारी होती. ‘फोर्स २’च्या वितरणाची जबाबदारी ‘के.सेरा सेरा’ या कंपनीला देण्यात आली होती. या चित्रपटाकडून निर्मात्यांना मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, या चित्रपटाला यश मिळू शकले नाही. दरम्यान हा चित्रपट आॅनलाईन लीक झाला होता. यामुळे हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर यश मिळवू शकला नाही असा निष्कर्ष निर्मात्यांनी काढला आहे. यासाठी के. सेरा सेरा वितरक कंपनीला जबाबदार ठरविण्यात आले आहे. 

बुधवारी वायाकॉम १८ च्या अधिकाºयांनी मुंबईच्या सायबर क्राईम सेलमध्ये आयपीसीच्या इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी अ‍ॅक्ट व कॉपीराईट अ‍ॅक्ट अंतर्गत फसवणूक केल्याची तक्रार नोंदविली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवून तपासाला सुरूवात केली आहे. यानुसार लवकरच के . सेरा. सेराच्या अधिकाºयांचे जबाब नोंदवतील. के. सेरा. सेरा कंपनीने पोलिसांनी आम्हाला विचारणा केली असल्याची कबुली दिली आहे. मध्यप्रदेशातील डाबरा येथील प्रकाश थिएटरच्या विरोधात आम्ही तक्रार केली असल्याचे के.सेरा.सेरा कंपनीने सांगितले आहे. 

प्रकाश सिनेमा येथे एक पायरेटेड डीव्हीडी सापडली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार के.सेरा.सेरा यांनी वितरित केलेल्या सर्व डीव्हीडीवर वॉटरमार्क लावण्यात आले होते. आॅनलाईन लीक प्रकरणी जप्त करण्यात आलेल्या डीव्हीडीवर प्रकाश सिनेमाला दिलेले वॉटरमार्क सापडले आहे. कंपनी प्रकाश सिनेमाच्या विरोधात कार्यवाही करून त्याचे पुरावे वायाकॉम १८ ला सादर केले होते. त्यानंतरही गुन्हा दाखल करण्यात आला होता. फोर्स २ रिलीज झाल्यानंतर काही वेळातच आॅनलाईन लीक झाला होता. इंटरनेटवर संपूर्ण चित्रपट पाहता येत होता, सोबतच त्याला डाऊनलोड क रता येत होते. के.सेरा.सेरा मागील २५ वर्षांपासून चित्रपटांचे वितरण करीत असून, पायरेसीचा नेहमीच विरोध केला आहे असे मत कंपनीकडून व्यक्त केले आहे. 


Web Title: Force 2: Crime against Distributors in the online leak case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.