'द फॉरगॉटन आर्मी’चा म्युझिक इव्हेंट, १०००हून अधिक संगीतकार करणार लाइव्ह परफॉर्मन्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 18:08 IST2020-01-23T18:08:15+5:302020-01-23T18:08:46+5:30
‘द फॉरगॉटन आर्मी’ वेबसीरिज लवकरच प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाली आहे.

'द फॉरगॉटन आर्मी’चा म्युझिक इव्हेंट, १०००हून अधिक संगीतकार करणार लाइव्ह परफॉर्मन्स
अमेझॉन प्राइम व्हिडीओ इंडियाची ‘द फॉरगॉटन आर्मी’ वेबसीरिज लवकरच प्रदर्शित होण्यासाठी सज्ज झाली आहे. ही भारतातील निर्मिती असलेली सर्वात मोठी सीरिज आहे, ज्यामध्ये सनी कौशल व शर्वरी मुख्य भूमिका साकारताना दिसून येणार आहेत.
‘द फॉरगॉटन आर्मी’ या सीरिजच्या रिलीज निमित्ताने निर्मात्यांद्वारे एका मोठ्या लाइव्ह कॉन्सर्टचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवारी मुंबईत हॉटेल ट्यूलिप स्टार येथे आयोजित करण्यात येत असलेल्या सर्वात मोठ्या म्युझिक इव्हेंटमध्ये १,००० संगीतकार लोकांना मंत्रमुग्ध करणार आहेत. निश्चितच हा आतापर्यंतचा सर्वात मोठा म्युझिक इव्हेंट होणार आहे, ज्यामध्ये अनेक अनुभवी संगीतकार आपल्या कलेची जादू दाखवताना दिसून येणार आहेत. या प्रसंगी सनी कौशल व शर्वरीसह कबीर खानची उपस्थितीदेखील लक्षवेधक ठरणार आहे.
अलीकडेच वेब सीरिजचे टायटल ट्रॅक 'आझादी के लिए' रिलीज करण्यात आले असून, या टायटल ट्रॅकने लोकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. हे गाणे प्रितमद्वारे कंपोझ करण्यात आले आहे.
अनुभवी चित्रपट निर्माता कबीर खानद्वारे निर्मित व दिग्दर्शित ‘द फॉरगॉटन आर्मी-आझादी के लिए’ येत्या २४ जानेवारीपासून अॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध होणार आहे.