चार चित्रपट, 2 कोटी प्रेक्षक अन् 390 कोटींची कमाई; चित्रपटसृष्टीची ऐतिहासिक कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2023 03:32 PM2023-08-14T15:32:31+5:302023-08-14T15:33:45+5:30

आतापर्यंत कोणत्याही चित्रपटांनी जी कामगिरी केली नाही, ती गदर 2, OMG 2 आणि जेलरने करुन दाखवली.

Four films, 2 crore audience and 390 crore revenue; A historical achievement of indian cinema | चार चित्रपट, 2 कोटी प्रेक्षक अन् 390 कोटींची कमाई; चित्रपटसृष्टीची ऐतिहासिक कामगिरी

चार चित्रपट, 2 कोटी प्रेक्षक अन् 390 कोटींची कमाई; चित्रपटसृष्टीची ऐतिहासिक कामगिरी

googlenewsNext

Bollywood News: कोरोना काळात चित्रपटसृष्टी पूर्णपणे ठप्प झाली होती. लॉकडाऊनमुळे जवळपास दोन वर्षे सिनेमागृहात चित्रपट रिलीज झाला नाही. अनेक बिग बजेट चित्रपटही ओटीटीवर येऊ लागले. पण, गेल्या काही महिन्यांपासून सिनेसृष्टीने वेग पकडला आहे. एका पाठोपाठ एक हिट चित्रट येत आहेत. गेल्या शुक्रवारी बॉलिवूड आणि टॉलिवूडमधील काही बिग बजेट चित्रपट रिलीज झाले, ज्यावर चाहते तुटून पडले.

सुपरस्टार रजनीकांत यांचा 'जेलर', अक्षय कुमारचा 'ओएमजी 2', सनी देओलचा 'गदर 2' आणि चिरंजीवीचा 'भोला शंकर', हे बिग बजेट चित्रपट प्रदर्शित झाले. एकाच दिवशी हे सर्व चित्रपट रिलीज होत असल्यामुळे सर्व चित्रपटांना नुकसान होण्याचा मोठा होता. मात्र, या सर्व चित्रपटांच्या कमाईने चाहत्यांसह चित्रपट विश्लेषकही चकीत झाले. या चार चित्रपटांनी मिळून चित्रपटसृष्टीचा इतिहासच बदलून टाकला. 

सनी देओल, अक्षय कुमार, सुपरस्टार रजनीकांत आणि चिरंजीवी यांच्या चित्रपटांनी अवघ्या तीन दिवसांत असे काम केले, जे यापूर्वी कधीही झाले नाही. यापूर्वीही अनेकदा दोन किंवा जास्त चित्रपटांचे क्लॅश झाले, यात चित्रपटांना मोठे नुकसान सहन करावे लागले. पण, या चार चित्रपटांनी मिळून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत तब्बल 390 कोटींहून अधिक कमाई केली. 

मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया आणि प्रोड्युसर्स गिल्ड ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, तीन दिवसांत, म्हणजेच 11 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट दरम्यान देशभरातील 2 कोटी 10 लाखांहून अधिक लोकांनी थिएटरमध्ये जाऊन हे चित्रपट पाहिले. कोरोनानंतर थिएटर्स उघडल्यापासून हा वीकेंड सर्वात व्यस्त होता. गेल्या 10 वर्षांत असे कधीही घडले नाही.

गदर 2 ने पहिल्या तीन दिवसात 135 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. OMG 2 ने दिवसांत सुमारे 44 कोटी रुपयांचा, जेलरने 146 कोटी रुपयांचा आणि भोला शंकरने 26 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. भोला शंकर अपेक्षेप्रमाणे चालू शकला नाही, पण इतर तिन्ही चित्रपटांनी 11 ते 13 ऑगस्ट दरम्यान इतिहास रचला आहे.

Web Title: Four films, 2 crore audience and 390 crore revenue; A historical achievement of indian cinema

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.