अमीषा पटेलच्या विरोधात बॉलिवूडच्या या दिग्दर्शकानं ठोठावला न्यायालयाचा दरवाजा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2019 02:25 PM2019-07-01T14:25:25+5:302019-07-01T14:26:01+5:30
बॉलिवूड अभिनेत्री अमीषा पटेलच्या विरोधात बॉलिवूडच्या एका दिग्दर्शकानं अडीच कोटींची फसवणूक केल्याचा आरोप केलाय.
बॉलिवूड दिग्दर्शक अजय कुमार सिंग यांनी अभिनेत्री अमीषा पटेलवर अडीच कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे आणि यासाठी त्यांनी अमीषाच्या विरोधात रांचीतील न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. अमीषाने तिच्या देसी मॅजिक चित्रपटासाठी पैसे उधार घेतले होते. अजय कुमार सिंग यांनी सांगितले की, तीन कोटी रुपयांचा चेक बाऊन्स झाल्यानंतर त्यांनी रांची न्यायालयात केस दाखल केली आहे.
मागील वर्षी देसी मॅजिक चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी अमीषाने अजय कुमार सिंग यांच्याकडून पैसे उधार घेतले होते आणि आता तिला या पैशांबद्दल काहीही बोलयचं नाही आहे. अजय कुमार सिंग यांनी हेदेखील सांगितलं की, न्यायालयाकडून अमीषाला समन्स पाठवण्यात आलं आहे आणि तिला ८ जुलैपूर्वी न्यायालयात यावं लागणार आहे.
त्यांनी पुढे सांगितलं की, जर ती न्यायालयात आली नाही तर तिच्याविरोधात वॉरंट जारी केले जाणार आहे. १७ जूनला न्यायालयात एक वॉरंट जारी करण्यासाठी विरोध केला. कारण ती उत्तर देत नाही. मात्र न्यायालयानं अरेस्ट वॉरंट आधी पोलिसांच्या माध्यमातून तिला समन्स पाठवण्याची सूचना केली.
निर्माता व दिग्दर्शक अजय कुमार सिंग यांच्यानुसार २०१७ साली अमीषासोबत त्यांची भेट झाली आणि यादरम्यान दोघांमध्ये चित्रपटाबाबत चर्चा झाली.
या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं होतं. मात्र आर्थिक संकटामुळे हा प्रोजेक्ट मध्येच थांबला होता. त्यामुळे अजय कुमार सिंग अडीच कोटी उधार दिले होते.