ही खरी मैत्री! नसीरुद्दीन यांना वाचवण्यासाठी ओम पुरींनी लावली होती जीवाची बाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2023 01:16 PM2023-08-06T13:16:18+5:302023-08-06T13:17:00+5:30

Friendship day: रेस्टॉरंटमधून बाहेर पडत असताना नसीरुद्दीन शाह यांच्यावर त्यांच्याच एका मित्राने चाकू हल्ला केला.

friendship-day-om-puri-save-his-friend-naseeruddin-shahs-life | ही खरी मैत्री! नसीरुद्दीन यांना वाचवण्यासाठी ओम पुरींनी लावली होती जीवाची बाजी

ही खरी मैत्री! नसीरुद्दीन यांना वाचवण्यासाठी ओम पुरींनी लावली होती जीवाची बाजी

googlenewsNext

सध्या सगळीकडे मोठ्या उत्साहात फ्रेंडशीप डे साजरा केला जात आहे. यामध्येच बॉलिवूड अभिनेता ओम पुरी (Om Puri) आणि नसीरुद्दीन शाह (Naseeruddin Shah) यांच्या मैत्रीची चर्चा रंगली आहे. या दोघांची खूप वर्षांपासून मैत्री असून एकदा ओम पुरी यांनी स्वत:चे प्राण पणाला लावून नसीरुद्दीन शाह  यांचा जीव वाचवला होता. एका चाकू हल्लेखोरासोबत झटापट करत त्यांनी नसीरुद्दीन शाह यांचा वाचवलं होतं.

१९७७ मध्ये ओम पुरी आणि नसीरुद्दीन शाह मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये गेले होते. या रेस्टॉरंटमधून बाहेर पडत असताना नसीरुद्दीन शाह यांच्यावर एकाने हल्ला केला. विशेष म्हणजे हा हल्लेखोर त्यांचाच एक जुना मित्र होता. परंतु, या हल्ल्यातून त्यांना ओम पुरींनी वाचवलं. नसीरुद्दीन शाह  यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये या घटनेचा उल्लेख केला आहे.

जसा माझ्यावर हल्ला झाला. ओम पुरी त्या हल्लेखोरावर तुटून पडला आणि त्याला कंट्रोलमध्ये केलं. त्यानंतर त्यानेच मला दवाखान्यात सुद्धा नेलं, असं त्यांनी त्यांच्या पुस्तकात म्हटलं आहे.

"आम्ही त्यावेळी आमच्या एका सिनेमाचं चित्रीकरण करत होतो. मी आणि ओम रात्रीचं जेवण करत होतो. त्याचवेळी जसपाल तेथे आला. त्याच्या मनात माझ्याविषयी आधीच राग होता. तेथे आल्यावर त्याने ओमला नमस्कार केला. पण, आम्ही दोघांनी एकमेकांकडे दुर्लक्ष केलं. त्यानंतर त्याने माझ्या कमरेत काहीतरी धारदार वस्तू घुसवल्याचं मला जाणवलं. मी समोर पाहिलं तर जसपालच्या हातात रक्ताने माखलेला चाकू होता", असं नसीरुद्दीन शाह म्हणाले.

पुढे ते म्हणतात, "जसपालने पुन्हा माझ्यावर दुसऱ्यांदा चाकूने वार करायचा प्रयत्न केला. पण, तेवढ्यात ओमने दोन लोकांच्या मदतीने जसपालला धरलं. त्यानंतर ओमने मला रुग्णालयात नेलं. या काळात पोलिसांची वाट पाहत असलेल्या रेस्टॉरंट व्यवस्थापकासोबत त्याने वादही घातला. बऱ्याच वेळानंतर आम्ही कपूर रुग्णालयात पोहोचलो."

दरम्यान, ओम पुरी आणि नसीरुद्दीन शाह  यांची खूप जुनी मैत्री होती. या दोघांनीही फिल्म अँड टेलीव्हिजन इन्स्टीट्यूट ऑफ इंडियामध्ये एकत्र शिक्षण घेतलं आहे. परंतु, २०१७ मध्ये ओम पुरी यांचं निधन झालं.
 

Web Title: friendship-day-om-puri-save-his-friend-naseeruddin-shahs-life

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.