Friendship Day : हे स्टार्स म्हणतात, ‘ही दोस्ती तुटायची नाय’!!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2017 08:57 AM2017-08-06T08:57:53+5:302017-08-06T14:33:26+5:30
आयुष्यात इतर नात्यांप्रमाणे मैत्रीचे नाते खूपच महत्त्वाचे असते. खरा मित्र तोच असतो जो अडचणीच्या काळात धावून येतो. त्यामुळेच आयुष्यात ...
आ ुष्यात इतर नात्यांप्रमाणे मैत्रीचे नाते खूपच महत्त्वाचे असते. खरा मित्र तोच असतो जो अडचणीच्या काळात धावून येतो. त्यामुळेच आयुष्यात जीवलग मित्र असणे गरजेचे असते. खरं तर ज्या गोष्टी आपण परिवारातील इतर सदस्यांबरोबर शेअर करीत नाही, त्या गोष्टी आपण आपल्या जीवलग मित्राबरोबर शेअर करीत असतो. असेच काहीसे मित्र बॉलिवूडमध्ये आहेत, ज्यांनी मैत्रीचे खरेखुरे उदाहरण चाहत्यांसमोर ठेवले आहे. वास्तविक बॉलिवूडमध्ये भाडणं, कॅटफाइट कायमच्या असल्याने सेलिब्रिटींमध्ये मैत्री असूच शकत नाही, असा सामान्यांचा समज असतो. वास्तवात मात्र हे चित्र पूर्णत: वेगळे असून, बºयाचशा बॉलिवूड स्टार्सनी जिवाला जीव देणारी मैत्री जपली आहे. त्यामुळेच त्यांची मैत्री आज चाहत्यांसाठी एक मिसाल ठरत आहे.
अनुष्का शर्मा-रणबीर कपूर
बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटींच्या मैत्रीची चर्चा आपण ऐकतो, परंतु अनुष्का शर्मा आणि रणबीर कपूर यांच्यातील मैत्री ऐवढी घट्ट आहे की, मैत्रीचा विषय काढताच या दोघांचे नाव घेतले जाते. चित्रपटांमध्येच नव्हे तर चित्रपट प्रमोशनदरम्यानही या दोघांची मैत्री चर्चेत असते.
परिणिती चोपडा-संजना बत्रा
परिणिती चोपडा त्या अभिनेत्रीपैकी एक आहे, ज्या अभिनेत्री मैैत्रींचे नाते टिकविण्यासाठी गंभीर असतात. त्यामुळेच गेल्या कित्येक काळापासून परिणिती चोपडा आणि संजना बत्रा यांच्यातील मैत्री टिकून आहे. जर तुम्ही परिणितीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर गेलात तर या दोघींमधील मैत्री किती घट्ट आहे हे तुमच्या लक्षात येईल.
करिना कपूर खान - अमृता अरारा
करिना कपूर आणि अमृता अरोरा यांच्यातील मैत्रीचे नाते किती घट्ट आहे, हे आपल्याला वेळोवेळी दिसून येते. कारण वर्कआउट असो व शूटिंग असो या दोघी बºयाचवेळा एकत्र स्पॉट होतात. बेबो तर शूटिंगमधून फ्री झाल्यानंतर लगेचच तिची लेडीलव्ह अमृता हिच्यासोबत वेळ व्यतित करते.
आमिर खान-सलमान खान
आमिर खान आणि सलमान खान यांच्यातील मैत्रीच्या गप्पा नेहमीच रंगत असतात. वास्तविक दोघेही सुपरस्टार त्यांच्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त असतात. मात्र जेव्हा-केव्हा या दोघांना एकमेकांचे कौतुक करण्याची संधी मिळते तेव्हा ते मुक्तपणे एकमेकांवर स्तुतीसुमने उधळतात.
मिका-प्रीतम
कदाचित ही बाब कोणाला माहीत नसेल की, मिका आणि प्रीतम खूप चांगले मित्र आहेत. बºयाचदा हे दोघे एकमेकांचे काम कुठल्याही प्रकारचे शुल्क न घेताच करतात. त्यावरून यांच्यातील मैत्री किती घट्ट आहे, यांचा अंदाज बांधता येते.