अमिताभ ते शाहरुखपर्यंत, कलाकारांच्या घरात घुसखोरी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 10:30 IST2025-01-17T10:29:17+5:302025-01-17T10:30:34+5:30
मुंबईमध्ये देशभरातून कलाकार येत असतात. त्यांना हे शहर सुरक्षित वाटते. मात्र, असे असले तरी मुंबईत अनेक कलाकारांच्या घरात घुसखोरी आणि चोरी झाल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत.

अमिताभ ते शाहरुखपर्यंत, कलाकारांच्या घरात घुसखोरी!
चित्रपटसृष्टीची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये देशभरातून कलाकार येत असतात. त्यांना हे शहर सुरक्षित वाटते. मात्र, असे असले तरी मुंबईत अनेक कलाकारांच्या घरात घुसखोरी आणि चोरी झाल्याच्या घटना यापूर्वीही घडल्या आहेत. त्याचा हा घेतलेला आढावा. अभिनेता सैफ अली खानवर चाकूने सहा वेळा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चोराने त्याच्या घरात घुसून त्याच्यावर हल्ला केला.
जानेवारी,२०२५ - अभिनेत्री पूनम ढिल्लनच्या घरी चोरी करणाऱ्याला खार पोलिसांनी अटक केली. आरोपी हा अभिनेत्रीच्या घरी रंगकाम करायला आला होता ज्याचे नाव समीर अन्सारी (३७) असून त्याने चोरलेला सगळा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
जून, २०२४ - प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांच्या अंधेरी वीरा देसाई येथील कार्यालयावरही दरोडा टाकत अंदाजे ४.१५ लाख रोख रक्कम व अंदाजे ५० हजार रुपयांचा ऐवज घेऊन पळ काढला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाल्यावर अंबोली पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले होते.
मे, २०२३ - अभिनेता सलमान खानची बहीण अर्पिता खान हिच्या खार येथील घरातून ५ लाख रुपयांचे कानातले चोरी करण्यात करण्यात आले होते. याप्रकरणी पोलिसांनी संदीप हेगडे (३०) नामक नोकराला अटक केली होती.
मार्च, २०२३ - सुपरस्टार शाहरुख खानच्या मुंबईतील मन्नत या बंगल्यात २० ते २२ वयोगटातील दोन तरुण घुसले होते. त्यांनी स्वतःला किंगखानचे फॅन्स म्हणवत त्याच्या बंगल्याच्या बाहेरील भिंतीवर चढून आवारात प्रवेश करत तिसऱ्या मजल्यापर्यंत जाऊन पोहोचले. मात्र त्यानंतर सुरक्षारक्षकांनी पकडत वांद्रे पोलिसांच्या ताब्यात दिले होते.
ऑगस्ट २०१६ - बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांच्या जलसा या बंगल्यामध्ये प्रवेश करण्यासाठी २३ वर्षीय व्यक्तीने सुरक्षाभंग केला होता. त्यालाही बच्चन यांच्या सुरक्षारक्षकांनी पकडून नंतर पोलिसांच्या ताब्यात दिले.