'जवान' ते 'द मार्व्हल्स', २०२३ सालात स्त्री शक्तीचा जयजयकार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 07:36 PM2023-07-26T19:36:32+5:302023-07-26T19:37:03+5:30

नारी शक्तीचे दर्शन घडवणारा आणखी एक चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. 'द मार्व्हल्स' मध्ये तीन महिला सुपरहिरो एकत्र येणार असून या तिघीजणी दुष्टांचा मुकाबला करत जगाला वाचवणार आहेत.

From 'Jawan' to 'The Marvels', the year 2023 celebrates woman power | 'जवान' ते 'द मार्व्हल्स', २०२३ सालात स्त्री शक्तीचा जयजयकार

'जवान' ते 'द मार्व्हल्स', २०२३ सालात स्त्री शक्तीचा जयजयकार

googlenewsNext

जुलै महिना संपत आला असून अर्ध वर्ष संपलं आहे. २०२३ हे वर्ष मोठ्या पडद्यावरील नारीशक्तीच्या दमदार कामगिरीमुळे प्रेक्षकांच्या लक्षात राहीलं. पठाण चित्रपटात शाहरूख खान आणि जॉन अब्राहम यांच्या भूमिका होत्या. मात्र या दोघांच्या तोडीस तोड अभिनय करत दीपिका पादुकोणने रुबिनाची भूमिका रंगवली होती. तिने साकारलेली रुबिना प्रेक्षकांच्या कायमस्वरुपी लक्षात राहील. नारी शक्तीचे दर्शन घडवणारा आणखी एक चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. 'द मार्व्हल्स' मध्ये तीन महिला सुपरहिरो एकत्र येणार असून या तिघीजणी दुष्टांचा मुकाबला करत जगाला वाचवणार आहेत.

२०२३ साली नारीशक्तीचे दर्शन घडवणारे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत किंवा होणार आहेत. यंदाच्या दिवाळीतील आतषबाजी आणखी आकर्षक करण्यासाठी ३ महिला सुपरहिरो एकत्र येणार आहेत. द मार्व्हल सिनेमॅटीक युनिव्हर्सचा 'द मार्व्हल्स'  दिवाळीत प्रदर्शित होणार असून यामध्ये कॅप्टन मार्व्हल (ब्री लार्सन), मिस मार्व्हल ( इमान वेलानी) आणि मोनिका रॅम्ब्यू (टेयोना पॅरीस) यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात या तिघींच्या शक्तीची  एकमेकींच्या शक्तींसोबत अदलाबदल होते. या गोंधळातून सावरता सावरता त्यांना दुष्ट शक्तींशी मुकाबला करावा लागतो. या तिघींना  'क्री'च्या दुष्ट आणि शक्तिशाली डार-बेन (झावी अॅश्टन)शी मुकाबला करावा लागणार आहे. डार-बेनने कॅप्टन मार्व्हलचा नायनाट करण्याचा विडा उचललेला असतो. या खलनायिकेचा तिघी मिळून कसा मुकाबला करतात हे पाहणं धमाकेदार ठरणार आहे. हा चित्रपट दिवाळीमध्ये इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

 

ग्रेटा गरविग यांनी दिग्दर्शित केलेला बार्बी चित्रपट, प्रदर्शित होण्याच्या आधीपासूनच चर्चेत होता. हा चित्रपट २२ जुलैला रिलीज झाला आहे. अनोखी कथा, ती सांगण्याचं वेगळेपण हा या चर्चेचा केंद्रबिंदू होता. या चित्रपटात महिलांचा प्रभाव हा ठळकपणे लक्षात राहतो. मारगॉट रॉबी आणि रायन गॉसलिंग यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट २०२३ सालचा सगळ्यात हिट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटामुळे मोठ्या पडद्यावरील नारीशक्तीचा दबदबा पुन्हा एकदा दिसून आला.


कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी अभिनीत आणखी एक २०२३ ब्लॉकबस्टर म्हणजे ‘सत्यप्रेम की कथा’ २९ जूनला रिलीज झाला. ज्यामध्ये कियारा एका वेगळ्या मात्र दमदार भूमिकेत दिसली. कियाराच्या ‘कथा’ या व्यक्तिरेखेला समीक्षक आणि प्रेक्षक यांच्याकडून प्रचंड प्रशंसा मिळाली आहे. सहजसुंदर अभिनय आणि पडद्यावरील तिचा वावर हा थक्क करणार आहे. सह कलाकारांसोबत तिची जोडी प्रेक्षकांना आवडल्याने कियारा ही यावर्षीच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक झाली आहे.

राणी मुखर्जी ही वैविध्यपूर्ण आणि अप्रतिम अभिनयातून साकारलेल्या भूमिकांमुळे ओळखली जाते. मिसेस चटर्जी व्हर्सेस नॉर्वे हा चित्रपट सत्य घटनेवर आधारीत असून तिने रंगवलेली  देबिका चॅटर्जीची भूमिका ही फारच सुंदर आहे. चित्रपटात देबिका तिच्या मुलासाठी नॉर्वे सरकारच्या कसा लढा देते हे दाखवण्यात आले आहे. या चित्रपटाद्वारे राणी मुखर्जीने आपले नाणे आजही खणखणीत वाजते हे दाखवून दिले आहे. हा चित्रपट १७ मार्चला रिलीज झाला.

 २५ जानेवारीला प्रदर्शित झालेल्या पठाण चित्रपटाने २०२३ सुरूवातच धमाकेदार केली.  शाहरुख खान, दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम स्टारर पठाण हा प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून धरला होता. अत्यंत वेगवान आणि अॅक्शनपॅक्ड असा हा चित्रपट असून या चित्रपटात शाहरूख, जॉनसारखे अभिनेते असतानाही विशेष लक्षात राहिली ती दीपिका पदुकोण.

दीपिका ने रुबिना नावाचे पात्र साकारले होते. या चित्रपटात रुबिना ही अंडरकव्हर एजंट दाखवण्यात आली असून तिने केलेले स्टंट आणि अॅक्शन पाहताना प्रेक्षक सॉलिड खूश झालेत.

Web Title: From 'Jawan' to 'The Marvels', the year 2023 celebrates woman power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.