"त्या भेटीतून...", मुकेश खन्ना यांना रणवीर सिंगला 'शक्तीमान'ची नाही तर द्यायची होती ही भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 11:30 IST2024-12-16T11:29:53+5:302024-12-16T11:30:34+5:30
Mukesh Khanna And Ranveer Singh : ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना यांचा 'शक्तिमान' शो खूप चर्चेत होता. यामध्ये त्यांनी सुपरहिरोची भूमिका साकारली होती. अलिकडेच मुकेश खन्ना यांनी 'शक्तिमान' चित्रपटात रणवीर सिंगला मुख्य भूमिकेसाठी नकार दिल्याबद्दल सांगितले.

"त्या भेटीतून...", मुकेश खन्ना यांना रणवीर सिंगला 'शक्तीमान'ची नाही तर द्यायची होती ही भूमिका
ज्येष्ठ अभिनेते मुकेश खन्ना (Mukesh Khanna) यांचा 'शक्तिमान' (Shaktiman) शो खूप चर्चेत होता. यामध्ये त्यांनी सुपरहिरोची भूमिका साकारली होती. अलिकडेच मुकेश खन्ना यांनी 'शक्तिमान' चित्रपटात रणवीर सिंग(Ranveer Singh)ला मुख्य भूमिकेसाठी नकार दिल्याबद्दल सांगितले. त्यांनी आपल्या पूर्वीच्या विधानांबद्दलचे गैरसमज दूर केले आणि आदित्य चोप्राच्या टीमला 'शक्तीमान'चे अधिकार देण्यास स्पष्टपणे नकार का दिला हे स्पष्ट केले.
न्यूज १८ इंग्लिशमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, मुकेश खन्ना म्हणाले, 'मी त्याला (रणवीर सिंग) थांबवले असे म्हणणे चुकीचे आहे. तो मला प्रेमाने भेटायला आला. ही भेट निश्चित करण्यात आली होती, जी सोनी यांनी आयोजित केली होती. रणवीर मला पटवून देण्यासाठी आला होता की तो शक्तीमानची भूमिका करू शकतो. या भूमिकेत त्याने रस दाखवण्याची ही पहिलीच वेळ नव्हती.
YRF ऑफर नाकारली
मुकेश खन्ना यांनी खुलासा केला की YRF प्रोडक्शन हाऊसने 'शक्तिमान'चे हक्क खरेदी करण्यात स्वारस्य दाखवले होते, परंतु त्यांनी नकार दिला होता. ते म्हणाले की, 'दहा वर्षांपूर्वी आदित्य चोप्राच्या टीमने माझ्याशी संपर्क साधला आणि शक्तीमानचे हक्क देण्यास सांगितले. त्याचवेळी, योगायोगाने रणवीर सिंगचा शक्तीमान वेशभूषेतील एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. मी त्यांना अधिकार देण्यास नकार दिला, परंतु त्यांनी माझ्यासोबत एकत्र काम करण्याचा प्रस्ताव दिला. त्यांनी ते डिस्को ड्रामा बनवावे असे मला वाटत नव्हते.'
मुकेश खन्ना यांना रणवीरला द्यायची होती ही भूमिका
रणवीर सिंगचे कौतुक करताना मुकेश खन्ना म्हणाले की, 'रणवीर एनर्जीने भरलेला आहे आणि त्याने माझ्याशी ३ तास मनापासून गप्पा मारल्या. त्याने मला त्याचा पहिला चित्रपट कसा मिळाला हे सांगितले आणि शक्तीमानचे पात्र कसे साकारायचे हे देखील त्याने मला सांगितले. रणवीरने तामराज किलविशची भूमिका करावी, अशी माझी इच्छा होती. तर तो शक्तीमानची व्यक्तिरेखा साकारू शकतो हे सांगण्याचा प्रयत्न करत होता. मात्र, त्या बैठकीतून कोणताच निष्कर्ष निघाला नाही.
रणवीर सिंगबद्दल म्हणाले...
मुकेश खन्ना पुढे म्हणाले, 'मी त्याला थांबायला लावले नाही हा गैरसमज होता. तो माझ्याशी सलग ३ तास बोलत होता. त्याला इतका वेळ थांबवण्याइतका मी मोठा अभिनेता नाही. नंतर तो त्याच्या प्रमोशनल टीमसोबत परत आला आणि त्याच्या PR मॅनेजरनेही मला तो काय काम करतो हे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.
शक्तीमान ९०च्या दशकातील लोकप्रिय मालिका
मुकेश खन्ना यांचा 'शक्तिमान' मालिका १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धापासून ते २००० च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत प्रसारित झाली होती. हा भारतातील पहिला सुपरहिरो शो मानला जातो. तो मुकेश खन्ना यांनी बनवला होता आणि ते मुख्य भूमिकेतही दिसले होते. या शोमधील मुख्य खलनायकाचे नाव तामराज किलविश होते.