Liger Box Office Collection Day 3: तीन दिवसांतच फुस्स! ‘लाइगर’नं तिसऱ्या दिवशी कमावले फक्त इतके कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2022 12:21 PM2022-08-28T12:21:45+5:302022-08-28T12:24:05+5:30
Liger Box Office Collection Day 3: विजय देवरकोंडाचा ‘लाइगर’ हा सिनेमा 25 ऑगस्टला रिलीज झाला. रिलीजआधी या चित्रपटाची जोरदार चर्चा होती. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरडुपर हिट होणार, अशी अपेक्षा होती. पण रिअॅलिटी यापेक्षा वेगळी आहे
Liger Box Office Collection Day 3: साऊथ सिनेमाचा हँडसम हंक विजय देवरकोंडाचा (Vijay Deverakonda) ‘लाइगर’ हा सिनेमा 25 ऑगस्टला रिलीज झाला. रिलीजआधी या चित्रपटाची जोरदार चर्चा होती. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर सुपरडुपर हिट होणार, बॉलिवूडला नवसंजीवनी देणारा ठरणार, अशी अपेक्षा होती. पण रिअॅलिटी यापेक्षा वेगळी आहे. होय, विजय देवरकोंडाच्या या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. काही लोकांना हा सिनेमा आवडला असला तरी सोशल मीडियावर निगेटीव्ह कमेंट्स, रिव्ह्यूचा जणू पूर आला आहे. या निगेटीव्ह वर्ड माऊथमुळे चित्रपट तीनच दिवसांत सुस्त पडला आहे.
Unlike #Liger Telugu and Tamil, #Liger Hindi remained steady on Saturday, compared to Friday..
— Ramesh Bala (@rameshlaus) August 28, 2022
It collected ₹ 4.50 Crs Nett.. Early Estimates..
Doing well in Mass Belts UP and Bihar..
विजय देवरकोंडाच्या ‘लाइगर’च्या तिसऱ्या दिवसाच्या कलेक्शनचा आकडा समोर आला आहे. ‘लाइगर’च्या कलेक्शनमध्ये तिसऱ्या दिवशी मोठी घट पहायला मिळाली. तिसऱ्या दिवशी या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने केवळ 4.50 कोटींची कमाई केली. अर्थात युपी, बिहारमध्ये हा सिनेमा अद्यापही चांगला बिझनेस करतोय. ‘लाइगर’च्या हिंदी व्हर्जनने पहिल्या दिवशी 1.25 कोटींची कमाई केली. दुसऱ्या दिवशी या चित्रपटाने 4.50 कोटी इतकी कमाई केली. तिसऱ्या दिवशीही इतक्याच कोटींचा गल्ला जमवला.
आयएमडीबीने त्यांच्या साईटवर प्रेक्षकांनी सर्वात कमी रेटिंग्स केलेल्या चित्रपटांची यादी जाहीर केली आहे आणि या यादीत विजय देवरकोंडाच्या ‘लाइगर’ या चित्रपटाला सर्वात कमी रेटिंग्स मिळालं आहे. या यादीत आमिर खानच्या ‘लाल सिंग चड्ढा’या चित्रपटाला 10 पैकी 5, अक्षय कुमारच्या ‘रक्षा बंधन’ला 10 पैकी 4.6, तापसी पन्नूच्या ‘दोबारा’ या चित्रपटाला 10 पैकी 2.9 आणि रणबीर कपूरच्या ‘शमशेरा’ला 10पैकी 4.9 रेटिंग मिळालं आहे. ‘लाइगर’ ला 10० पैकी फक्त 1.9 रेटिंग आहे. अर्थात येत्या काही दिवसात ‘लाइगर’चं रेटिंग्स सुधारण्याची शक्यता आहे.