सनी देओलची लागली लॉटरी! 'गदर २'नंतर 'या' बड्या दिग्दर्शकासोबत करणार चित्रपट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2023 18:10 IST2023-10-31T17:57:24+5:302023-10-31T18:10:05+5:30
सनी देओलकडे आता चित्रपटांच्या ऑफरच्या रांगा लागल्या आहेत. सनी देओलच्या हातात नुकताच आणखी एक मोठा चित्रपट आला आहे.

सनी देओलची लागली लॉटरी! 'गदर २'नंतर 'या' बड्या दिग्दर्शकासोबत करणार चित्रपट!
अभिनेता सनी देओल सध्या गदर 2 चित्रपटांमुळे चर्चेत आहे. 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर : एक प्रेमकथा’ या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. ‘गदर 2’च्या या प्रचंड यशानंतर सनी देओलचं नशीब फळफळलं आहे. सनी देओलकडे आता चित्रपटांच्या ऑफरच्या रांगा लागल्या आहेत. सनी देओलच्या हातात नुकताच आणखी एक मोठा चित्रपट आला आहे. ज्यामध्ये त्याला पहिल्यांदाच बॉलिवूड दिग्दर्शक जोडी अब्बास-मस्तानसोबत काम करण्याची संधी मिळत आहे.
अब्बास-मस्तान आणि सनी देओल यांच्यात एका प्रोजेक्टबाबत बऱ्याच दिवसांपासून बोलणी सुरू होती. हा एक मोठ्या प्रमाणावर अॅक्शन थ्रिलर चित्रपट असणार आहे, जो ट्विस्ट आणि टर्नने परिपूर्ण असेल. मात्र, अद्यापपर्यंत सनी देओल आणि निर्मात्यांनी या प्रकल्पाबाबत कोणतीही अधिकृत माहिती शेअर केलेली नाही.
अब्बास-मस्तान ही एक भारतीय चित्रपट निर्मिती जोडी आहे. अब्बास अलीभाई बर्मावाला आणि मस्तान अलीभाई बर्मावाला भाऊ आहेत. या दोघांनी बॉलीवूडला अनेक हिट चित्रपट दिले आहेत. अब्बास – मस्तान आपल्या सस्पेन्स- थ्रिलर चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत. आतापर्यंत ‘बाजीगर’, ‘रेस’, ‘रेस 2’, ‘अजनबी’ आणि ‘ऐतराज’ अशा चित्रपटांमधून त्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं.
2023 हे वर्ष सनी देओलसाठी खूप चांगले ठरले. 11 ऑगस्ट, 2023 ला रिलीज झालेला गदर 2 आताही काही थिएटरमध्ये सुरू आहे. 600 कोटींहून जास्त कमाई केली आहे. सनी लवकरच 'लाहोर 1947' या चित्रपटात दिसणार आहे. त्याचबरोबर सनी'बाप' चित्रपटातही पाहायला मिळणार आहे. जो पुढच्या वर्षी रिलीज होणार आहे. तो अयोध्या रामजन्मभूमीवर आधारीत चित्रपटातही दिसणार आहे. याशिवाय 'बॉर्डर 2' सिनेमाचं शूटिंग 2024 च्या मध्यानंतर सुरू होणार असल्याची माहिती आहे.