गदर-2 ने मोडला KGF-2 चा रेकॉर्ड, ठरला सर्वाधिक कमाई करणारा तिसरा सिनेमा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2023 15:34 IST2023-08-27T15:27:29+5:302023-08-27T15:34:01+5:30
गदर २ ने कमाईच्या बाबतीत KGF-2 चा रेकॉर्ड मोडला आहे.

sunny deol
बॉलिवूड अभिनेता सनी देओल आणि अमीषा पटेल यांचा 'गदर २' हा बहुचर्चित सिनेमा अलिकडेच प्रदर्शित झाला. ११ ऑगस्ट रोजी रिलीज झालेल्या या सिनेमाने पहिल्या दिवसापासून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत या सिनेमाने अनेक रेकॉर्ड त्याच्या नावावर केले असून पुन्हा एक नवीन रेकॉर्ड केला आहे. गदर २ ने कमाईच्या बाबतीत KGF-2 चा रेकॉर्ड मोडला आहे.
शनिवारी गदर २ ने १३.५ कोटींची कमाई केली असून sacnilkच्या वृत्तानुसार, आतापर्यंत या सिनेमाने एकूण ४३८.७० कोटी रुपयांचा गल्ला जमा केला आहे. यापूर्वी KGF-2 (हिंदी) ने बॉक्स ऑफिसवर ४३५ कोटींची कमाई केली होती. परंतु, केजीएफ २ चा रेकॉर्ड मोडत गदरने ४३८.७० कोटींची कमाई केली आहे.
यापूर्वी शाहरुख खानच्या पठाणने ५४३ कोटी रुपये, बाहुबली-2 (हिंदीने) ५१० कोटी रुपये आणि केजीएफ २ ने ४३५ कोटींचं कलेक्शन केलं होतं. परंतु, आता केजीएफच्या कमाईचा रेकॉर्ड मोडत गदरने ४३८.७० कोटी रुपयांची कमाई करत सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत तिसरं स्थान मिळवलं आहे. इतकंच नाही तर येत्या काही दिवसात गदर २ लवकरच ५०० कोटींचा गल्ला जमवणार असल्याचं म्हटलं जात आहे.
दरम्यान, देशासह विदेशातही गदर २ धुमाकूळ घालत आहे. ऑस्ट्रेलिया, जर्मनी, अमेरिका आणि यूके सारख्या देशांमध्ये सुद्धा गदर २ पाहण्यासाठी प्रेक्षक गर्दी करत आहेत. अनिल शर्मा दिग्दर्शित गदर २ हा सिनेमा 'गदर एक प्रेम कथा' चा सीक्वेल आहे.