Video : एसीसंदर्भात केली तक्रार, 'गदर २' पाहण्यासाठी आलेल्या दोघांना बाऊन्सर्सकडून मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 14:18 IST2023-08-17T14:17:21+5:302023-08-17T14:18:28+5:30
'गदर 2' पाहण्यासाठी आलेल्या दोन जणांनी एसी चालत नाही म्हणून तक्रार केली.

Video : एसीसंदर्भात केली तक्रार, 'गदर २' पाहण्यासाठी आलेल्या दोघांना बाऊन्सर्सकडून मारहाण
सनी देओलचा 'गदर 2' (Gadar 2) थिएटरमध्ये धुमाकूळ घालतोय. प्रेक्षक मोठ्या संख्येने सिनेमा पाहायला पोहोचत आहेत. अनेक शो हाऊसफुल आहेत. गदर २ ची क्रेझ बघता लोकांना नियंत्रणात आणणंही कठीण झालंय. काल कानपूरच्या एका थिएटरमध्ये बाऊन्सर्स आणि प्रेक्षक यांच्यात बाचाबाची झाली. एसी चालत नाही म्हणून दोन जणांनी तक्रार केली. त्यांचा वाद इतका विकोपाला गेला की बाऊन्सर्सने दोघांना बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
'गदर 2' पाहण्यासाठी आलेल्या दोन जणांनी एसी चालत नाही म्हणून तक्रार केली. काही वेळात दुरुस्त होईल असं व्यवस्थापकांकडून सांगण्यात आलं. मात्र बऱ्याच वेळानेही एसी दुरुस्त झाला नाही. गर्मी वाढल्याने प्रेक्षकांनी आरडाओरडा सुरु केला. दरम्यान दोन जण आणि बाऊन्सर्स यांच्यात बाचाबाची झाली. बघता बघता वाद विकोपाला गेला आणि प्रकरण मारामारी पर्यंत गेलं. बाऊन्सर्सने दोघा प्रेक्षकांना जबर मारहाण केल्याचं व्हिडिओत दिसून येत आहे. शेवटी पोलिसांनी मध्यस्थी करत सर्वांना दम दिला.
A spectator who had gone to watch the film Gadar-2 was assaulted in Kanpur. In the PVR Cinema Hall of South Ex Mall, when the young man lodged his complaint about the malfunctioning of the AC, the bouncers beat him up. Watch this video to know more.@DMKanpur@kanpurnagarpolpic.twitter.com/9i5hbf2i69
— विवेक मिश्रा (@VIVEKMIS1) August 17, 2023
कानपूरच्या साऊथ एक्स मॉलमधील पीव्हीआर थिएटरमध्ये एसी चालत नसल्याने काही प्रेक्षकांनी तिकीटाचे पैसे परत मागितले. यानंतर त्यांची व्यवस्थापकांशी बाचाबाची झाली. शेवटी शिव्या, मारहाण यामुळे प्रकरण हाचाबाहेर गेलं. पोलिसांनी सर्वांना दम देत वाद मिटवला. यासंदर्भात पीडित प्रेक्षकांनी बाऊन्सर्सवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. लवकरच चौकशी करुन कारवाई केली जाईल असं आश्वासन पोलिसांनी दिलं आहे.