Sunny Deol : 'गदर 2' स्टार सनी देओलच्या बंगल्याचा होणार लिलाव; कर्ज फेडलं नाही, बँक वसूल करणार 56 कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2023 12:19 PM2023-08-20T12:19:35+5:302023-08-20T12:38:06+5:30

Sunny Deol : एकीकडे सनीचा चित्रपट थिएटरमध्ये प्रचंड कमाई करत असताना दुसरीकडे खऱ्या आयुष्यात त्याच्या एका मोठ्या प्रॉपर्टीचा लिलाव होणार आहे.

gadar 2 star Sunny Deol villa put ona uction by bank of baroda for recovery of 56 crores loan | Sunny Deol : 'गदर 2' स्टार सनी देओलच्या बंगल्याचा होणार लिलाव; कर्ज फेडलं नाही, बँक वसूल करणार 56 कोटी

Sunny Deol : 'गदर 2' स्टार सनी देओलच्या बंगल्याचा होणार लिलाव; कर्ज फेडलं नाही, बँक वसूल करणार 56 कोटी

googlenewsNext

सनी देओल सध्या सर्वत्र चर्चेत आहे. 'गदर 2' चित्रपट थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. गेल्या आठवड्यात थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या 9 दिवसांत बक्कळ कमाई केली आहे. हा चित्रपट बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत सामील झाला आहे. 90 च्या दशकात बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या स्टारपैकी एक असलेल्या सनीला मधल्या दोन दशकांमध्ये खूप संघर्ष करावा लागला आणि त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल करू शकले नाहीत.

आता अखेर 'गदर 2' ने त्याला पुन्हा एकदा ते भव्य यश दाखवून दिलं आहे, ज्याची तो बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत होता. पण एकीकडे सनीचा चित्रपट थिएटरमध्ये प्रचंड कमाई करत असताना दुसरीकडे खऱ्या आयुष्यात त्याच्या एका मोठ्या प्रॉपर्टीचा लिलाव होणार आहे. सनीवर बँकेचं मोठं कर्ज होतं, ज्याच्या वसुलीसाठी बँकेने आता त्याच्या मुंबईतील मालमत्तेचा लिलाव करण्याची जाहिरात काढली आहे.

काय आहे प्रकरण?

बँक ऑफ बडोदाने सनी देओलच्या व्हिलाच्या लिलावासाठी जाहिरात दिली आहे. सनीने बँकेकडून मोठ्या रकमेचं कर्ज घेतलं होतं. या कर्जासाठी त्याने मुंबईतील जुहू परिसरात असलेला 'सनी व्हिला' नावाचा आपला व्हिला गहाण ठेवला. त्याऐवजी त्याला जवळपास 56 कोटी रुपये बँकेत भरायचे होते, जे अद्याप भरलेले नाहीत.

हे कर्ज आणि त्यावर आकारले जाणारे व्याज वसूल करण्यासाठी बँकेने या मालमत्तेचा लिलाव करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. बँकेच्या जाहिरातीत म्हटले आहे की, 'सनी व्हिला'चा लिलाव 25 सप्टेंबर रोजी होणार आहे. या लिलावासाठी मालमत्तेची रिझर्व्ह प्राइस 51.43 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे.

बॉक्स ऑफिसवर तुफान वेगाने कमाई करणाऱ्या 'गदर 2' या चित्रपटाने अवघ्या 8 दिवसांत 300 कोटींचा आकडा पार केला होता. शनिवारच्या कलेक्शननंतर चित्रपटाच्या कमाईने 9 दिवसांत 335 कोटींचा आकडा पार केला आहे. लवकरच 'गदर 2' सनीच्या खात्यात 400 कोटी कमावणारा चित्रपट म्हणून नोंद होणार आहे. 'गदर 2'ची ज्या पद्धतीने कमाई होत आहे, ते पाहता तो बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या 'पठाण' चित्रपटाला टक्कर देऊ शकतो, असे मानले जात आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: gadar 2 star Sunny Deol villa put ona uction by bank of baroda for recovery of 56 crores loan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.