सनी देओलचा ‘गदर २’ पाहून चाहते नाराज, म्हणाले, “दिग्दर्शकाच्या मुलाला लॉन्च करण्यासाठी...”

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2023 03:27 PM2023-08-11T15:27:55+5:302023-08-11T15:30:08+5:30

Gadar 2 : ‘गदर २’ पाहिल्यानंतर सनी देओलचे चाहते नाराज, म्हणाले...

gadar 2 sunny deol fans upset after watching the movie troll anil sharma for tara singh less screen appearance | सनी देओलचा ‘गदर २’ पाहून चाहते नाराज, म्हणाले, “दिग्दर्शकाच्या मुलाला लॉन्च करण्यासाठी...”

सनी देओलचा ‘गदर २’ पाहून चाहते नाराज, म्हणाले, “दिग्दर्शकाच्या मुलाला लॉन्च करण्यासाठी...”

googlenewsNext

बहुचर्चित ‘गदर २’ हा बॉलिवूड चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित झाला. २००१ साली प्रदर्शित झालेल्या सनी देओल आणि अमीषा पटेल मुख्य भूमिकेत असलेल्या ‘गदर’ सिनेमाचा हा सीक्वेल आहे. तब्बल २२ वर्षांनंतर गदर सिनेमाचा सीक्वेल आल्यामुळे प्रेक्षक आतुर होते. ‘उड जा काले कव्वे’, ‘मै निकला गड्डी लेके’ या गाण्यांमुळे ‘गदर २’ चित्रपटाबाबत चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. परंतु, प्रेक्षकांच्या अपेक्षेस हा चित्रपट खरा उतरला नसल्याचं चित्र आहे.

अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर २’मध्ये सनी देओल आणि अमीषा पटेल यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटातून अनिल शर्मा यांचा लेक उत्कर्ष शर्माने तारा सिंहच्या लेकाची भूमिका साकारली आहे. हा पाहिल्यानंतर सनी देओलचे चाहते नाराज आहे. ट्विटरवरुन प्रतिक्रिया देत चाहत्यांनी गदर २ सिनेमाबाबात नाराजी व्यक्त केली आहे. गदर २ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी ट्वीट केलं आहे. सनी देओलच्या चित्रपटाने प्रेक्षकांची निराशा केल्याचं चित्र आहे. नेटकऱ्यांनी ट्वीट करत सनी देओल आणि अनिल शर्मा यांना ट्रोल केलं आहे.

एकाने ट्वीट करत “गदर हा खूप चांगला चित्रपट होता. पण, गदर २ फ्लॉप आहे. सनी देओल पडद्यावर जास्त वेळ दिसेल, अशी अपेक्षा होती. पण, दिग्दर्शकाच्या मुलाला पुन्हा लॉन्च करण्यासाठी हा चित्रपट काढल्याचं वाटत आहे”, असं एकाने म्हटलं आहे.

“असा सीक्वेल कोणालाच नको होता. गदर २मुळे गदर चित्रपटावर डाग लागला आहे. मास्टरपीसला मास्टरपीसच असू द्या”, असं ट्वीट एकाने केलं आहे.

OMG 2 Review : दमदार कथा, अंगावर काटा आणणारे संवाद, अन्...; अक्षयचा OMG 2 कसा आहे?

“सनी देओलच्या चाहत्यांनी मूर्ख समजलं आहे का? संपूर्ण चित्रपटात फक्त उत्कर्ष शर्माच दिसत आहे. सनी देओलला फक्त ३० मिनिटांचा रोल दिला आहे. जनता माफ नाही करणार”, असंही एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.  

“चित्रपटात मै निकला गाण्याव्यतिरिक्त बघण्यासारखं काहीही नाही. कथा, पटकथा, संवाद सगळं भोजपुरी चित्रपटासारखं आहे. गदर म्हणजे डोक्याला ताप आहे.”

रितेश देशमुखच्या ‘वेड’चा गिनीज बुक रेकॉर्ड! अभिनेता म्हणतो, “हिंदी चित्रपटसृष्टीत कधीही...”

'गदर २' चित्रपट बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी ४०-४५ कोटींची कमाई करेल अशी अपेक्षा वर्तविण्यात आली आहे. या चित्रपटाची प्रदर्शनाआधीच १ लाखांहून अधिक तिकिटे विकली गेली होती. परंतु, या चित्रपटाने प्रेक्षकांची निराशा केली आहे. 

Web Title: gadar 2 sunny deol fans upset after watching the movie troll anil sharma for tara singh less screen appearance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.