Gadar 2 teaser : बैलगाडीचं चाक फिरवताना दिसला 'तारा सिंग', 'गदर 2' चा बहुप्रतिक्षित टीझर रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2023 13:40 IST2023-06-12T13:39:18+5:302023-06-12T13:40:47+5:30
जावई आहे तो पाकिस्तानचा, त्याचं स्वागत करा, नाहीतर यावेळी तो हुंड्यात लाहोरच घेऊन जाईल.

Gadar 2 teaser : बैलगाडीचं चाक फिरवताना दिसला 'तारा सिंग', 'गदर 2' चा बहुप्रतिक्षित टीझर रिलीज
सनी देओलच्या (Sunny Deol) 'गदर 2' (Gadar 2) ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. तारा सिंग या सिनेमातून काय कमाल करणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. ही उत्सुकता आता आणखी ताणली आहे कारण 'गदर 2' चा बहुप्रतिक्षित टीझर रिलीज झाला आहे. 2001 साली आलेल्या 'गदर' मध्ये सनी देओलने हँडपंप उचलला होता. तर आता 'गदर 2' मध्ये सनी पाजी चक्क बैलगाडीचं चाकच गरगर फिरवताना दिसतोय.
जावई आहे तो पाकिस्तानचा, त्याचं स्वागत करा, टीका लावा नाहीतर यावेळी तो हुंड्यात लाहोरच घेऊन जाईल या वाक्यांसह टीझर सुरु होतो. पाकिस्तानात जिथे लोक नारे देत असतात तिथे सनी पाय रोवून उभा राहतो. इतकंच नाही तर दुष्मनांवर अक्षरश: बैलगाडीचं चाक गरगर फिरवून फेकताना दिसतो. 'गदर 2' चा हा टीझर पाहून अंगावर शहारे येतील हे नक्की. सनी पाजीच्या चाहत्यांचा आनंद तर गगनात मावेनासा झालाय.
सनी देओल आणि अमिषा पटेल (Amisha Patel) यांचा 'गदर' सिनेमा 2001 साली रिलीज झाला होता. सिनेमाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं. फाळणीचा काळ, त्यात तासासिंग आणि सकीनाची प्रेमकहाणी,तारासिंगची देशभक्ती, सुपरहिट गाणी आणि जबरदस्त अॅक्शनने भरलेला हा सिनेमा आजही लोकप्रिय आहे. आता 'गदर 2' देखील धुमाकूळ घालण्यास सज्ज आहे. अनिल शर्मा यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 11 ऑगस्ट रोजी सिनेमा रिलीज होत आहे.