22 वर्षांनंतर पुन्हा अनुभवता येणार सनी-अमिषाची लव्हस्टोरी; 'या' दिवशी पुन्हा रिलीज होणार गदर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2023 12:50 PM2023-05-26T12:50:16+5:302023-05-26T12:50:56+5:30
Gadar ek prem katha: सनी देओलने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने सिनेमाची रिलीज डेट सांगितली आहे.
22 वर्षांपूर्वी रुपेरी पडद्यावर 'गदर: एक प्रेम कथा' हा सिनेमा रिलीज झाला आणि बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. या सिनेमामध्ये अभिनेता सनी देओल आणि अमिषा पटेल मुख्य भूमिकेत झळकले होते. विशेष म्हणजे या सिनेमामुळे बॉलिवूडचा एक काळ गाजला. त्यानंतर तब्बल 22 वर्षानंतर पुन्हा हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे. सनी देओलने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सिनेमाची रिलीज डेट सांगितली आहे.
सनी देओलने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने सिनेमाची रिलीज डेट सांगितली आहे. सोबतच आकर्षक कॅप्शनही दिलं आहे. तेच प्रेम, तिच कथा पण यावेळी येणारा अनुभव वेगळा. 'गदर: एक प्रेम कथा' पुन्हा एकदा सिनेमागृहात येतोय तोही ९ जून रोजी. 4K आणि डॉल्बी एटमॉस साउंडमध्ये हा सिनेमा रिलीज होईल. पण तेही मर्यादित काळासाठी. उद्या सिनेमाचा ट्रेलर येतोय.. त्यामुळे तुम्ही वाटा पाहा आणि उत्सुकता कायम ठेवा, असं कॅप्शन देत सनीने ही एक पोस्टर शेअर केलं आहे.
दरम्यान,हा सिनेमा २२ वर्षानंतप पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यावेळी प्रेक्षकांना गदर २ ची झलकही दाखवण्यात येणार आहे. हा सिनेमा मल्टिप्लेक्ससोबतच सिंगल स्क्रीनवरही रिलीज होणार आहे. हा सिनेमा १९७१ साली झालेल्या भारत-पाकिस्तानच्या फाळणीवर आणि त्यावेळी झालेल्या युद्धावर आधारित आहे. गदरच्या पहिल्या भागात सनी देओल त्याच्या पत्नीला घरी परत आणण्यासाठी पाकिस्तानात गेला असतो. त्यानंतर आता दुसऱ्या भागात तो पाकिस्तानमधून पुन्हा भारतात येतो का? त्याचं काय होतं हे दाखवलं जाणार आहे. सिनेमाच्या दुसऱ्या पार्टचं चित्रीकरण पूर्ण झालं असून हा सिनेमा ११ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणार आहे.