Gadar Ek Prem Katha : हॅंडपंप उचलणारा 'तारा सिंग' परत येतोय, 'गदर प्रेमकथा' पुन्हा प्रदर्शित होणार; निर्मात्यांचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 11:54 AM2023-01-12T11:54:59+5:302023-01-12T11:56:14+5:30
चाहत्यांसाठी आनंदाची बातमी ती म्हणजे 'गदर' पुन्हा एकदा चित्रपटगृहात पाहता येणार आहे. होय 'गदर एक प्रेमकथा' थिएटरमध्ये रिलीज करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.
Gadar Ek Prem Katha : तारासिंग आणि सकीनाची प्रेकहाणी असणाऱ्या 'गदर' सिनेमाने चांगलाच धुमाकूळ घातला होता. हॅंडपंप उचलून लढणाऱ्या सनी देओलवर चाहते खूपच प्रभावित झाले होते. भारत पाकिस्तान फाळणी, पाकिस्तानच्या मुलीवर जडलेले प्रेम आणि आपल्या प्रेमाला परत मिळवण्यासाठी भिडलेला सनी देओल अशी एकंदर ही प्रेमकथा प्रेक्षकांनाच खूपच भावली होती. यातली गाणी तर प्रचंड गाजली. याचा अनुभव मोठ्या पडद्यावरच जास्त चांगला घेता येतो. आता चाहत्यांसाठी आनंदाची बातमी ती म्हणजे 'गदर' पुन्हा एकदा चित्रपटगृहात पाहता येणार आहे. होय 'गदर एक प्रेमकथा' थिएटरमध्ये रिलीज करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे.
'गदर'चा सिक्वल लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. सध्या त्याचे शूटिंग सुरु आहे. दरम्यान 'गदर एक प्रेमकथा' पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित करायचा असा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे. आता २२ वर्षांनंतर पुन्हा 'गदर' थिएटरमध्ये बघता येणार आहे. १५ जून २००१ रोजी पहिला गदर रिलीज झाला होता. आता याच दिवशी यावर्षी तो पुन्हा रिलीज केला जाईल.
All goats be alert bcos lion is coming #SunnyDeol#Gadar2 first glimpse out. One more #blockbuster is awaiting. pic.twitter.com/7RKCFGchlD
— mehuls514 (@mehuls514) January 3, 2023
Gadar 2 : हिंदुस्तान जिंदाबाद रहेगा... बैलगाडीचं चाक उचलून लढताना दिसला 'गदर-२' मधला 'तारा सिंग'
'गदर २ द कथा कंटिन्यू' (Gadar 2 The Katha Continues)असे सिक्वलचे नाव आहे. यातील सनी देओलची एक झलक नुकतीच सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. यात तो बैलगाडीचे चाक उचलून लढताना दिसणार आहे. अमिषा पटेल सकीना च्या भूमिकेत आहे. तर 'गदर' मध्ये बालकलाकाराची भूमिका साकारलेला चीते म्हणजेच उत्कर्ष शर्मा आता मोठा झाला आहे. त्याचीही यात भूमिका आहे. गदर २ चे शूट लखनऊमध्ये झाले आहे. लखनऊच्या मार्टिनियर कॉलेजलाच पाकिस्तान सेनेचे मुख्यालय बनवून तिथे पाकिस्तानचा झेंडा फडकवण्यात आला होता.