Gadar 2 : 'गदर-एक प्रेम कथा'ची कथा ऐकून घाबरला होता गोविंदा, सनीमुळे सव्वा वर्ष लांबलं होतं शूटींग

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2023 08:00 AM2023-03-02T08:00:00+5:302023-03-02T08:00:02+5:30

Gadar 2 : २२ वर्षांनंतर ‘गदर: एक प्रेमकथा’ या सिनेमाचा सीक्वल येतोय. अशात या चित्रपटाशी संबंधित एक ना अनेक किस्से सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

gadar ek prem katha stories starring sunny deol ameesha patel before gadar 2 | Gadar 2 : 'गदर-एक प्रेम कथा'ची कथा ऐकून घाबरला होता गोविंदा, सनीमुळे सव्वा वर्ष लांबलं होतं शूटींग

Gadar 2 : 'गदर-एक प्रेम कथा'ची कथा ऐकून घाबरला होता गोविंदा, सनीमुळे सव्वा वर्ष लांबलं होतं शूटींग

googlenewsNext

१५ जून २००१ रोजी सनी देओल (Sunny Deol) आणि अमीषा पटेलचा (Ameesha Patel) ‘गदर: एक प्रेमकथा’ (Gadar Ek Prem Katha) हा सिनेमा रिलीज झाला होता. 'हमारा हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा' सारखे डायलॉग्स असो किंवा 'मै निकला ओ गड्डी लेकर' सारखी गाणी असो सनीचा 'गदर-एक प्रेम कथा' चित्रपट चांगलाच गाजला होता. त्यावेळी आजच्या सारखी मल्टीप्लेक्स नव्हती. पण सिंगल थिएटर्समध्ये या सिनेमानं नुसता धुमाकूळ घातला होता. सिनेमाची तिकिटं संपायची, पण प्रेक्षकांच्या रांगा संपत नव्हत्या. अगदी पहाटे ३ वाजतापासूनचे सगळे शो हाऊसफुल असायचे. जमिनीवर बसून, उभं राहून लोकांनी हा सिनेमा बघितला होता.

ऐकून आश्चर्य वाटेल पण, ‘गदर: एक प्रेमकथा’ रिलीज झाला तेव्हा समीक्षकांनी या चित्रपटाला सुमार चित्रपटांच्या रांगेत टाकलं होतं.  एका समीक्षकाने तर ‘गटर: एक प्रेमकथा’ असा चित्रपटाचा उल्लेख केला होता. पण समीक्षकांनी नाकारलेला हाच सिनेमा प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला.
आता सुमारे २२ वर्षांनंतर या सिनेमाचा सीक्वल अर्थात ‘गदर २’ (Gadar 2)येतोय. अशात या चित्रपटाशी संबंधित एक ना अनेक किस्से सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एक किस्सा गोविंदाचा आहे.

होय, असं म्हणतात की, ‘गदर: एक प्रेमकथा’साठी सनी देओल पहिली पसंत नव्हता. तर त्याच्याआधी हा सिनेमा गोविंदाला ऑफर झाला होता. अर्थात चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी ही नुसती अफवा असल्याचं म्हटलं होतं. मात्र आपण गोविंदाला या सिनेमाची स्क्रिप्ट ऐकवली होती आणि ती ऐकून तो घाबरला होता, अशी कबुली त्यांनी दिली होती.

काय होता तो किस्सा...
दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी महाराजा चित्रपटाच्या सेटवर गोविंदाला ‘गदर: एक प्रेमकथा’ची कथा ऐकवली होती. ती ऐकून गोविंदा घाबरला होता. इतक्या मोठ्या स्केलचा सिनेमा कसा बनवणार, असा प्रश्न त्याला पडला होता. त्याकाळात भारतात पाकिस्तानचा सेटवर उभारणंही सोप्प काम नव्हतं. त्यामुळेच कथा ऐकून गोविंदा काहीसा साशंक होता.

सव्वा वर्ष चाललं शूटींग
‘गदर: एक प्रेमकथा’चं शूटींग सव्वा वर्ष चाललं. याचं कारण होतं सनी देओल. होय, या चित्रपटासाठी सनीला दाढी वाढवायची होती. पण सनीने आधीच काही सिनेमे साईन केले होते. ब्रेक घेऊन तो त्या सिनेमांचं शूट करायला जायचा आणि त्यासाठी क्लीन शेव करायचा. पुन्हा दाढी वाढवून ‘गदर: एक प्रेमकथा’ची शूटींग करायचं म्हटल्यावर वेळ लागायचा.  

Web Title: gadar ek prem katha stories starring sunny deol ameesha patel before gadar 2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.