बिग बींच्या बालपणीची भूमिका साकारून मिळवली लोकप्रियता, आता अभिनय सोडून करतोय बिझनेस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 05:22 PM2024-04-12T17:22:35+5:302024-04-12T17:23:00+5:30

Amitabh Bachchan :अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले, त्यापैकी एक म्हणजे कुली. पण, या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या बालपणीची भूमिका साकारणारा बालकलाकार कोण आहे हे तुम्हाला माहीत आहे का?

Gained popularity by portraying the childhood role of Amitabh Bachchan, now leaving acting and business | बिग बींच्या बालपणीची भूमिका साकारून मिळवली लोकप्रियता, आता अभिनय सोडून करतोय बिझनेस

बिग बींच्या बालपणीची भूमिका साकारून मिळवली लोकप्रियता, आता अभिनय सोडून करतोय बिझनेस

बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) ८१ वर्षांचे झाले आहेत आणि आजही ते तारूण्यात ज्या उर्जेने काम करत होते, त्याच उर्जेने काम करत आहेत. दरवर्षी अमिताभ बच्चन कोणत्या ना कोणत्या चित्रपटात दिसतात. त्याच वेळी, ते एक रिॲलिटी शो देखील होस्ट करत आहेत आणि आता ते प्रभास आणि दीपिका पादुकोण अभिनीत 'कल्की 2898 एडी' मधील त्याच्या भूमिकेसाठी चर्चेत आहे, जो या वर्षी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले, त्यापैकी एक म्हणजे कुली. पण, या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या बालपणीची भूमिका साकारणारा बालकलाकार कोण आहे हे तुम्हाला माहीत आहे का?

हा बालकलाकार म्हणजे रवी वलेचा, ज्याला मास्टर रवी असेही म्हणतात. रवी वालेचा बऱ्याच वर्षांपूर्वी सिने जगतापासून दूर गेला होता, पण अभिनयाला अलविदा केल्यानंतर रवी वलेचा आता काय करतोय आणि कुठे आहे? रवी वलेचा सध्या काय करत आहेत हे तुम्हालाही माहिती नसेल तर आम्ही तुम्हाला त्याच्याबद्दल सांगतो.

रवी वलेचाने या सिनेमात केलंय काम

रवी वलेचा अर्थात मास्टर रवीने  केवळ कुलीच नाही तर ‘अमर अकबर अँथनी’, ‘शक्ती’, ‘मिस्टर नटरवरलाल’, ‘फकीरा’, ‘तुम्हारे बिना’, ‘खुद्दार’, ‘नास्तिक’, ‘परिचय’, ‘रोटी’, ‘यादों की बारात’, ‘कर्ज’, ‘सीता और गीता’ आणि ‘देश प्रेमी’ यांसारख्या चित्रपटात त्याने अमिताभ बच्चन यांच्या बालपणीची भूमिका साकारली होती. रवी ४ वर्षांचा असताना फिल्मी दुनियेत प्रवेश केला. त्याने बहुतेक काम बाल कलाकार म्हणून केले आहे आणि अनेक चित्रपटांमध्ये अमिताभ बच्चन यांच्या बालपणीच्या भूमिका केल्या. रवीने अनेक सुपरहिट चित्रपट केले.

जसजसा रवी मोठा झाला तसतसा तो रवी वलेचा म्हणून ओळखला जाऊ लागला. चित्रपटांनंतर रवीने टीव्हीमध्येही काम केले आणि टीव्हीमध्येही खूप नाव कमावले. पण, नंतर त्याने हळूहळू चित्रपट जगतापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला आणि एक वेगळे क्षेत्र निवडले. रवी वलेचाने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद येथून आंतरराष्ट्रीय व्यवसायात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. आता तो भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वोच्च बँकांना आदरातिथ्य सेवा प्रदान करतो.
 

Web Title: Gained popularity by portraying the childhood role of Amitabh Bachchan, now leaving acting and business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.