हे काय चाललंय? ‘तसल्या’ गाण्यांवर Instagram reels बनवणाऱ्यांवर भडकले गजराज राव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2021 04:30 PM2021-09-26T16:30:20+5:302021-09-26T16:35:41+5:30

अभिनेते गजराज राव यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ रिपोस्ट केलाय...., रिचा चड्ढाही संतापली...

Gajraj Rao calls out people for making Instagram reels on double entendre songs richa chadha in support | हे काय चाललंय? ‘तसल्या’ गाण्यांवर Instagram reels बनवणाऱ्यांवर भडकले गजराज राव

हे काय चाललंय? ‘तसल्या’ गाण्यांवर Instagram reels बनवणाऱ्यांवर भडकले गजराज राव

googlenewsNext
ठळक मुद्दे गजराज राव यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओवर अभिनेत्री रिचा चड्ढा हिने देखील कमेंट केली आहे.

सोशल मीडियावरचे वेगवेगळे ट्रेंड फॉलो करणारे असंख्य लोक आपल्या अवतीभवती सापडतील. मनोरंजन विश्वही याला अपवाद नाही. सोशल मीडियावर काही इंग्रजी गाणेही ट्रेंड करतात आणि अनेकजण या गाण्यातील शब्दांकडे लक्ष न देता अगदी आपल्या कुटुंबासोबत या गाण्यांवरचे इन्स्टा रील्स बनवून ते शेअर करतात. जस्टिन बीबरच्या ‘स्टे’ आणि ‘शट अप एंड बेंड ओव्हर’ या गाण्यांवरच्या इन्स्टा रिल्सने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. या गाण्यांमध्ये काही अश्लिल शब्द आहेत. पण त्या शब्दांकडे, त्याच्या अर्थाकडे लक्ष न देता लोक त्यावरचे रिल्स बनवून शेअर करत आहेत. अशा लोकांना आता ‘बधाई हो’ फेम अभिनेत गजराज राव (Gajraj Rao) आणि बॉलिवूड अभिनेत्री रिचा चड्ढा (Richa Chadda)यांनी चांगलंच सुनावलं आहे.
 गजराज राव यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केलाय. ग्राफिक आर्टिस्ट प्रसाद भट्ट यांनी अश्लील गाण्यांवर रील्स बनवणा-यांवर संताप व्यक्त करत एक व्हिडीओ शेअर केला होता. प्रसाद यांचा हा व्हिडीओ गजराज यांनी रिपोस्ट केला आहे. ‘मी प्रसादच्या मतांशी पूर्णपणे सहमत आहे’, असं कॅप्शन गजराज यांनी व्हिडीओला दिलंय.

 व्हिडीओत प्रसाद भट्ट म्हणतात...,
गजराज राव यांनी प्रसाद भट्ट यांचा व्हिडीओ शेअर करत, आंधळेपणाने ट्रेंड फॉलो करणाºयांना फटकारलं आहे. या व्हिडीओत   प्रसाद भट्ट म्हणतात, ‘लोकहो, इन्स्टाग्रामवर रील बनवण्याआधी तुम्ही गाण्यांचा अर्थ समजून घेण्याची तसदी  घेणार का? मी पाहतोय की आजी आजोबांसह संपूर्ण कुटुंब ‘शट अप और बेंड ओवर’ गाण्यावर डान्स करत आहे.   हे काय चाललंय? व्हायरल होण्यासाठी तुम्ही तुमची प्रतिष्ठादेखील पणाला लावणे किती योग्य आहे?’

रिचानेही व्यक्त केली नाराजी...

 गजराज राव यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओवर अभिनेत्री रिचा चड्ढा हिने देखील कमेंट केली आहे.  ‘ मी सहमत आहे. अर्थ माहित नसतानादेखील काही मुलं या गाण्यावर डान्स करताना दिसतात आणि त्रास होतो. इन्स्टाग्राम हे तुमची कला दाखवण्यासाठी, जगाशी संवाद सांधण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. पण डॉक्टर, बँकर, न्यूट्रीशियनिस्ट, बुक रीडर सगळेच रिल्समध्ये नाचताना दिसतात. सब को नाच नाच के अपनी बात बतानी पड रही है, क्यों?,’ अशी कमेंट तिनं केली आहे.
  

Web Title: Gajraj Rao calls out people for making Instagram reels on double entendre songs richa chadha in support

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.