तो मैं नही आ रहा ब्याह में...! विकी व कतरिनाच्या लग्नाला जाण्यास गजराज राव यांनी दिला नकार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2021 11:07 AM2021-12-02T11:07:14+5:302021-12-02T11:10:09+5:30
Vicky kaushal Katrina kaif Wedding : विकी आणि कतरिनाच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा आहे. पण त्याहीपेक्षा चर्चा आहे ती या लग्नातील निमंत्रित पाहुण्यांची. होय, लग्न की शिक्षा असं म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आलीये म्हणे.
Vicky kaushal Katrina kaif Wedding : विकी कौशल ( Vicky kaushal ) आणि कतरिना कैफ ( Katrina kaif) याच महिन्यात 9 डिसेंबरला लग्नबंधनात अडकणार आहेत. विकी आणि कतरिनाच्या लग्नाची सध्या जोरदार चर्चा आहे. पण त्याहीपेक्षा चर्चा आहे ती या लग्नातील निमंत्रित पाहुण्यांची. होय, लग्न की शिक्षा असं म्हणण्याची वेळ त्यांच्यावर आलीये म्हणे. विकी व कॅटच्या लग्नाचं निमंत्रण मिळालं म्हणून एकीकडे आनंद आहे. पण या लग्नासाठीच्या अटी पाहून अनेकांनी डोक्यावर हात मारून घेतला आहे. लग्नात उपस्थित असल्याचा खुलासा करू नये, लग्नसमारंभातील फोटो काढू नये, सोशल मीडियावर फोटो शेअर करू नये, सोशल मीडियावर लोकेशन शेअर करू नये, विवाहस्थळ सोडत नाही तोपर्यंत बाहेरील जगाशी संपर्क करू नये अशा एक ना अनेक अटी आहेत आणि पाहुण्यांना त्या सर्व मान्य कराव्या लागणार आहेत. काही पाहुणे या अटी कदाचित मान्य करतीलही. पण गजराज राव (Gajraj Rao )सारखा एखादा त्यापेक्षा लग्नाला न जाणं पसंत करेल. होय, सध्या अभिनेते गजराज राव यांची एक पोस्ट जाम चर्चेत आहे.
विकी व कॅटच्या लग्नासाठीच्या पार्श्वभूमीवर गजराज यांनी एक पोस्ट केली आहे. त्यांनी त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीमध्ये विकी व कॅटचा फोटो शेअर केला आहे. या फोटोवर ज्यावर ‘लग्नात मोबाइलवर बंदी असेल’, असं लिहिलेलं आहे. त्याखाली गजराज यांनी ‘सेल्फी नहीं लेने दोगे, तो मैं नहीं आ रहा ब्याह में,’असं लिहिलं आहे.
बॉलिवूड लाईफनं दिलेल्या वृत्तानुसार, विकी व कॅटच्या लग्नाचं नियोजन करणारी टीम निमंत्रित पाहुण्यांना रोज नव्या नियमाची माहिती देतेय. यातले काही नियम वा अटी तर अपमानास्पद वाटाव्यात इतक्या कठोर आहेत. ‘इंडिया टुडे’नं दिलेल्या वृत्तानुसार पाहुण्यांसाठीच्या अटींची यादी बरीच मोठी आहे. पाहुण्यांना काटेकोरपणे त्याचं पालन करावं लागणार आहे. त्यानुसार लग्नाला हजेरी लावणा-या पाहुण्यांना नवा ‘NDA’ साईन करावा लागणार आहे. म्हणजे, पाहुण्यांना non-disclosure agreement (NDA) साईन करावा लागणार आहे. लग्नात उपस्थित असल्याचा खुलासा करू नये, लग्नसमारंभातील फोटो काढू नये, सोशल मीडियावर फोटो शेअर करू नये, सोशल मीडियावर लोकेशन शेअर करू नये, विवाहस्थळ सोडत नाही तोपर्यंत बाहेरील जगाशी संपर्क करू नये अशा एक ना अनेक अटी यात आहेत.