Gala Time : सोनम कपूर आणि रिहा कपूर यांनी दुबईत स्विकारलं ‘हे’ चॅलेंज ; जाणून घ्या या चॅलेंजविषयी....

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2017 07:04 PM2017-01-20T19:04:09+5:302017-01-20T19:07:51+5:30

​‘द मॅनिक्विन चॅलेंज’ने अख्ख्या बॉलिवूडला भूरळ घातलीय. काय आहे हे चॅलेंज? सोनमच नव्हे तर ‘बी टाऊन’ च्या खुप साºया अभिनेत्री या खेळामुळे प्रभावित झाल्यात...जाणून घ्या या आॅनलाईन गेमविषयी...

Gala Time: Sonam Kapoor and Riha Kapoor accepted 'He' Challenge in Dubai; Know about this challenge .... | Gala Time : सोनम कपूर आणि रिहा कपूर यांनी दुबईत स्विकारलं ‘हे’ चॅलेंज ; जाणून घ्या या चॅलेंजविषयी....

Gala Time : सोनम कपूर आणि रिहा कपूर यांनी दुबईत स्विकारलं ‘हे’ चॅलेंज ; जाणून घ्या या चॅलेंजविषयी....

googlenewsNext
लिवूडची ‘मस्सकली गर्ल’ सोनम कपूर आणि तिची बहीण रिहा कपूर यांच्यात बहिणीपेक्षा मैत्रिणीचं नातं जास्त आहे. रिहा कपूर ही सोनमला फॅशनच्या विविध टिप्स देत असते. तसेच तिच्या चित्रपटाच्या प्रोडक्शनच्या कामातही मदत करते. या बहिणींचं ट्यूनिंग हे फारच समजूतदारपणाचं असल्याचं आत्तापर्यंत विविध कार्यक्रमांमध्ये दिसून आलंय. त्या दोघी नेहमी कुठेतरी आऊटिंगला किंवा लाँग डेस्टिनेशनला जात असतात. नुकतेच त्या दुबईतील ‘बुर्ज अल अरब’ या ठिकाणी हॉलीडे एन्जॉय करण्यासाठी गेल्या आहेत. 
 



२०१६ हे वर्ष ‘बी टाऊन’ मध्ये विविध कारणांनी गाजलं. घटस्फोट, ब्रेकअप्स, सेलिब्रिटींच्या मुलांचे जन्म यासोबतच आणखी एक कारण होतं ज्यामुळे हे वर्ष प्रचंड मोठ्या प्रमाणात सेलिब्रिटींच्या लक्षात राहिलं. काय आहे ते कारण? होय, ‘द मॅनिक्विन चॅलेंज’ या आॅनलाईन खेळाचं सर्वच सेलिब्रिटींना अक्षरश: वेड लागलं होतं. प्रियांका चोप्रा आणि जॅकलीन फर्नांडिस यांनी त्यांच्या खेळाचे अमेझिंग व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर केले होते. हा खेळ असा आहे, यात इंटरनेटवर एक व्हिडिओ लावला जातो आणि त्यावर डान्स करणारा किंवा इतरत्र फिरणारा व्यक्ती एकाच जागी स्तब्ध होतो. हा खेळ खेळताना उडणारी धम्माल हीच या खेळाची खरी मजा आहे. हीच मजा सोनम कपूर आणि रिहा क पूर या दुबईत अनुभवत आहेत. 

‘बॉलिवूडचा मिस्टर इंडिया’ अनिल कपूर यांची मुले सोनम कपूर, रिहा कपूर, हर्षवर्धन कपूर यांच्यातील नातं आणि ट्यूनिंग हे बहीणभावाचं असल्यापेक्षाही जास्त मित्रमैत्रिणीप्रमाणं आहे. काही महिन्यांपूर्वी एका मुलाखतीत बोलताना ते म्हणाले होते की,‘ माझ्या मुलांना मी नेहमीच एकमेकांसोबत प्रत्येक गोष्ट शेअर करण्याची सवय लावली. त्यामुळे ते एकमेकांसोबत मित्रमैत्रिणींप्रमाणेच वागतात.’ 

Also Read:
अखेर सोनम कपूरने दिली प्रेमाची कबुली; लंडनला असतो तिचा बॉयफ्रेंड!
पार्टीपूर्वी अन् पार्टीनंतर सोनम कपूरची सगळ्यांत आवडती अन् न आवडती गोष्ट कुठली?
 

Web Title: Gala Time: Sonam Kapoor and Riha Kapoor accepted 'He' Challenge in Dubai; Know about this challenge ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.