मिलिंद सोमणच्या न्यूड फोटोशूटनंतर गलीबॉय फेम सिद्धार्थ चतुर्वेदीचा शर्टलेस लूक आला चर्चेत

By तेजल गावडे | Updated: November 6, 2020 20:07 IST2020-11-06T20:06:57+5:302020-11-06T20:07:33+5:30

अभिनेता सिद्धांत चतुर्वेदीने नुकतेच काही शर्टलेस फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Galiboy fame Siddharth Chaturvedi's shirtless look after Milind Soman's nude photoshoot | मिलिंद सोमणच्या न्यूड फोटोशूटनंतर गलीबॉय फेम सिद्धार्थ चतुर्वेदीचा शर्टलेस लूक आला चर्चेत

मिलिंद सोमणच्या न्यूड फोटोशूटनंतर गलीबॉय फेम सिद्धार्थ चतुर्वेदीचा शर्टलेस लूक आला चर्चेत

अभिनेता मिलिंद सोमणचा न्यूड फोटो व्हायरल झाल्यानंतर आता गली बॉय फेम सिद्धांत चतुर्वेदीचा शर्टलेस फोटोशूट चर्चेत आला आहे. सिद्धांतचा फिटनेस फोटोत पहायला मिळते आहे. 


सिद्धांत चतुर्वेदीने नुकतेच काही शर्टलेस फोटो शेअर केले आहेत. या फोटोवर त्याचा मित्र आणि अभिनेता ईशान खट्टरचीही देखील रिएक्शन आली आहे. सिद्धार्थने त्याचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात तो त्याचे अॅब्स फ्लॉन्ट करताना दिसतो आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, तू समुद्राची लाट आहे. लोक म्हणतात की तू समुद्राशी निगडीत आहेस. मी चंद्र आहे आणि हे फक्त आपल्यालाच माहित आहे की तु माझी आहेस आणि मी तुझा. आपण कधीच भेटू शकत नाही आणि नाही एकमेकांना कधी ऐकू शकत. थोडा आनंद, थोडे दुःख. तू अशीच वाहत रहा आणि मी बस असेच येईन लपेन. वर्षे सरत जाईल.


सिद्धार्थच्या या पोस्टवर त्याचा मित्र ईशान खट्टरने रिएक्शन दिली आहे. त्याने त्याला हूडी असे संबोधले आहे. तसेच हुमा कुरैशीनेदेखील या फोटोवर वाह अशी कमेंट केली आहे.सेलिब्रेटींसोबत चाहत्यांनादेखील सिद्धांतचा हा फोटो खूप भावतो आहे. 


सिद्धांत चतुर्वेदीच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तो गली बॉयमुळे चर्चेत आला होता. यात आलिया भट, रणवीर सिंग आणि कल्की कोचलिन यासारखे कलाकार असतानाही त्याने त्याची वेगळी ओळख बनवली होती.

त्यानंतर तो इनसाइड एज आणि लाइफ सही है या प्रोजेक्टमध्ये दिसला. आता तो फोन बूथ, बंटी और बबली २ चित्रपटात दिसणार आहे.

Web Title: Galiboy fame Siddharth Chaturvedi's shirtless look after Milind Soman's nude photoshoot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.