चिन्मय मांडलेकर नथुरामच्या भुमिकेत; राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक दाखवणार 'गांधी-गोडसे एक युद्ध'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2022 01:55 PM2022-12-27T13:55:50+5:302022-12-27T14:00:46+5:30

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची तत्त्वं आणि नथुराम गोडसेची विचारसरणी यात कमालीची तफावत होती. दोघांच्या विचारांचे युद्धच जर मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळाले तर?

gandhi-godse-ek-yuddh-movie-chinmay-mandlekar-playing-nathuram-godse-rajkumar-santoshi-film | चिन्मय मांडलेकर नथुरामच्या भुमिकेत; राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक दाखवणार 'गांधी-गोडसे एक युद्ध'

चिन्मय मांडलेकर नथुरामच्या भुमिकेत; राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक दाखवणार 'गांधी-गोडसे एक युद्ध'

googlenewsNext

Gandhi Godse Ek Yuddh : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची तत्त्वं आणि नथुराम गोडसेची विचारसरणी यात कमालीची तफावत होती. दोघांच्या विचारांचे युद्धच जर मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळाले तर?  घायल, दामिनी, घातक, खाकी सारख्या चित्रपटांचे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजकुमार संतोषी ९ वर्षांनंतर पुन्हा दिग्दर्शकाच्या भुमिकेत परतले आहेत. त्यांच्या 'गांधी-गोडसे एक युद्ध' या सिनेमाची घोषणा काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती. आता सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे.   मराठमोळा अभिनेता चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) नथुराम गोडसेच्या भुमिकेत आहे.

टीझरच्या सुरुवातीलाच चिन्मय मांडलेकर म्हणजेच नथुराम गोडसे महात्मा गांधींसमोर येतो. हिंदू राष्ट्राला वाचवण्यासाठी तुमच्यासोबत विचारांचे युद्ध करणार असल्याचे तो सांगतो. तेव्हा महात्मा गांधी म्हणतात, विचारांच्या युद्धात हत्यार नाही तर विचारांचा वापर होतो. चित्रपटात ए आर रहमान (A R Rehman) यांनी म्युझिक दिले आहे ज्याची झलक टीझरमध्ये दिसते. गांधी गोडसे एक युद्ध चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवणार हे नक्की. अभिनेते दीपक एंटनी (Deepak Antany) यांनी महात्मा गांधी यांची भुमिका साकारली आहे.

गांधी-गोडसे एक युद्ध हा सिनेमा  २६ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. राजकुमार संतोषी हे ९ वर्षांनंतर दिग्दर्शकाच्या भुमिकेत आहेत. २०१३मध्ये रिलीज झालेला ‘फटा पोस्टर निकला हिरो’ हा चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री इलियाना डिक्रूझ ही जोडी मुख्य भूमिकेत झळकली होती. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता.

Web Title: gandhi-godse-ek-yuddh-movie-chinmay-mandlekar-playing-nathuram-godse-rajkumar-santoshi-film

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.