Gandhi Godse Ek Yudh BO Collection: ‘पठाण’ सुसाट...; 'गांधी गोडसे: एक युद्ध'ची काय आहे स्थिती? किती केली कमाई?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 11:27 AM2023-01-30T11:27:21+5:302023-01-30T11:29:42+5:30

Gandhi Godse Ek Yudh Box Office Collection : शाहरुख खानच्या ‘पठाण’ सोबतच 'गांधी गोडसे: एक युद्ध' देखील रिलीज झालाय. या चित्रपटाकडून निर्मात्यांना मोठ्या अपेक्षा होत्या...

Gandhi godse ek yudh box office collection shah rukh khan pathaan drowned | Gandhi Godse Ek Yudh BO Collection: ‘पठाण’ सुसाट...; 'गांधी गोडसे: एक युद्ध'ची काय आहे स्थिती? किती केली कमाई?

Gandhi Godse Ek Yudh BO Collection: ‘पठाण’ सुसाट...; 'गांधी गोडसे: एक युद्ध'ची काय आहे स्थिती? किती केली कमाई?

googlenewsNext

Gandhi Godse Ek Yudh Box Office Collection : शाहरुख खानचा ‘पठाण’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. केवळ पाचच दिवसांत शाहरूखच्या या सिनेमाने २८२ कोटींचा गल्ला जमवला आहे. जगभरातील कमाईचा आकडा ५५० कोटींवर गेला आहे. ‘पठाण’सोबत रिलीज झालेल्या 'गांधी गोडसे: एक युद्ध' या सिनेमाची काय स्थिती आहे. तर ‘पठाण’पुढे राजकुमार संतोषींच्या (Rajkumar Santoshi ) या सिनेमाचा टिकाव लागणं फार कठीण असल्याचं चित्र आहे.

सुमारे नऊ वर्षांनंतर दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी 'गांधी गोडसे: एक युद्ध' या चित्रपटासह मोठ्या पडद्यावर वापसी केली आहे. 'गांधी गोडसे: एक युद्ध' हा सिनेमा बॉक्स ऑफिस दणाणून सोडेल. लोकांना हा सिनेमा आवडेल, असा दावा संतोषी चित्रपटाच्या रिलीजआधी करत होते. प्रत्यक्षात या चित्रपटाच्या कमाईचे आकडे बघता, संतोषींच्या सगळ्या अपेक्षा फोल ठरल्याचं चित्र आहे. शाहरुख खानच्या 'पठाण'मुळे 'गांधी गोडसे: एक युद्ध' या चित्रपटाची साधी चर्चा देखील होत नाहीये.

'पठाण'सोबत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेला दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांचा 'गांधी गोडसे: एक युद्ध' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही. रिपोर्टनुसार, पहिल्या दिवशी या चित्रपटाने भारतात केवळ ८० लाखांचा बिझनेस केला. दुसऱ्या दिवशी कमाई आणखीच घटली. दुसऱ्या दिवशी सिनेमाने केवळ ३४ लाख कमावले. काल रविववारी रिलीजच्या पाचव्या दिवशी या चित्रपटाने फक्त १६ लाखांचा गल्ला जमवला.
  'गांधी गोडसे: एक युद्ध'चा बजेट 45 कोटी आहे. मात्र, चित्रपटाची ओपनिंग फारच निराशाजनक राहिली. 
खरं तर रिलीजआधी 'गांधी गोडसे: एक युद्ध' I चित्रपटाची प्रचंड चर्चा होती. पण राजकुमार संतोषी यांनी आपला सिनेमा 'पठाण'सोबत रिलीज करण्याची रिस्क घेतली. त्यातही केवळ ३०० स्क्रिन्सवर हा सिनेमा रिलीज करण्यात आला. रिलीजच्या पहिल्या दिवशी केवळ १८ टक्के प्रेक्षक हा सिनेमा पाहायला पोहाचले. उर्वरित सगळे प्रेक्षक जणू 'पठाण'साठी वेडे झालेत.  प्रेक्षकांनी पठाण चित्रपट पाहण्यावर अधिक भर दिला.

'गांधी गोडसे: एक युद्ध' हा एक फिक्शनल स्टोरी बेस्ड सिनेमा आहे. नथुराम गोडसे प्रार्थनास्थळी गांधींवर त्यांच्यावर तीन गोळ्या झाडतो, हा वास्तववादी इतिहास सुरुवातीला दाखवला आहे. नंतरची कथा काल्पनिक आहे. या हल्ल्यातून गांधीजी वाचतात. ते कारागृहात गोडसेची भेट घेतात. त्याला माफ केल्याचे जाहीर करतात. गोडसे मात्र आपल्या कृत्यावर अन् विचारावर ठाम असतो. नंतर गांधीजींना काही बाबींमुळे  अटक होते. जिथं गोडसेला ठेवलंय, त्याच कारागृहात अन् त्याच्याच बराकीत मलाही ठेवण्यात यावं, अशी अट ते पुढं करतात. प्रशासन मान्यता देतं. नंतर गांधी आणि गोडसे एकमेकांसह, एकाच बराकीत राहतात. तिथं त्यांचं वैचारिक युद्ध या चित्रपटातून अनुभवायला मिळतं. या सिनेमात दीपक अंतानी, चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar ) मुख्य भूमिकेत आहेत.

Web Title: Gandhi godse ek yudh box office collection shah rukh khan pathaan drowned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.