Gandhi Godse Ek Yudh: ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ चित्रपटाविरोधात आंदोलन; महात्मा गांधींना कमी लेखल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 11:44 AM2023-01-21T11:44:41+5:302023-01-21T11:46:09+5:30

Gandhi Godse Ek Yudh: या चित्रपटाद्वारे राजकुमार संतोषी हे नथुराम गोडसेचा गौरव करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप आंदोलकांकडून करण्यात आला.

gandhi godse ek yudh rajkumar santoshi film faced protests during promotion event police takes action | Gandhi Godse Ek Yudh: ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ चित्रपटाविरोधात आंदोलन; महात्मा गांधींना कमी लेखल्याचा आरोप

Gandhi Godse Ek Yudh: ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ चित्रपटाविरोधात आंदोलन; महात्मा गांधींना कमी लेखल्याचा आरोप

googlenewsNext

Gandhi Godse Ek Yudh: गेल्या काही महिन्यांपासून अनेक चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडले, अनेक चित्रपटांना नेटकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आले, तर काही चित्रपटांसाठी बॉयकॉट ट्रेंडही चालवण्यात आले. पठाण चित्रपटानंतर आता गांधी-गोडसे एक युद्ध या  चित्रपटावरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. यातच या चित्रपटाचे प्रमोशन सुरू असताना अचानक काही आंदोलक आले आणि चित्रपटाविरोधात घोषणाबाजी सुरू करण्यात आली. यानंतर निर्मात्यांना पोलिसांनी बोलावल्याची माहिती देण्यात आली आहे. 

‘गांधी-गोडसे एक युद्ध’ हा चित्रपट २६ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. पण या चित्रपटावरून वाद होताना दिसत आहे. या चित्रपटात नथुरामला खलनायक ठरवण्याचा प्रयत्न झाल्यास चित्रपटगृहांसमोर निदर्शने करून चित्रपट बंद पाडण्यात येईल, असा इशारा अमर हुतात्मा हिंदू महासभेने दिला होता. त्यानंतर आता या चित्रपटाविरोधात लोकांनी मुंबईमध्ये आंदोलन करण्यात आले आहे. चित्रपट निर्माते चित्रपटाचे प्रमोशन करत असताना काही लोकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. चित्रपटाच्या प्रमोशन कार्यक्रमात निर्मात्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले आणि जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

महात्मा गांधींना कमी लेखल्याचा आरोप

‘गांधी-गोडसे एक युद्ध’ या चित्रपटाद्वारे राजकुमार संतोषी हे महात्मा गांधीजींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचा गौरव करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप आंदोलकांनी केल्याचे सांगितले जात आहे. त्याठिकाणी विरोध इतका वाढला होता की निर्मात्यांना पोलिसांना बोलवावे लागले. निर्मात्यांनी आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना यश आले नाही आणि शेवटी त्यांना पोलिसांची मदत घ्यावी लागली. यासंदर्भात निर्मात्यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले आहे. प्रमोशनदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांना बोलावण्यात आल्याचे निवेदनात म्हटले आहे. तसेच ‘गांधी-गोडसे एक युद्ध’ हा चित्रपट गोडसेचा गौरव करत नाही, असे दिग्दर्शक, निर्माते राजकुमार संतोषी यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, गांधी गोडसे-एक युद्ध चित्रपटाची घोषणा होताच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. दमदार चित्रपटांनी बॉलिवूड गाजवणारे दिग्दर्शक राजकुमार संतोषी तब्बल नऊ वर्षांनी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला संगीत ए. आर. रहमान यांचे आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: gandhi godse ek yudh rajkumar santoshi film faced protests during promotion event police takes action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.