‘गंदी बात’ फेम गहना वशिष्ठला हृदयविकाराचा झटका, प्रकृती गंभीर
By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2021 04:40 PM2021-07-05T16:40:03+5:302021-07-05T18:15:12+5:30
Gehana Vasisth hospitalised : गहनावर मुंबईच्या एका रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गहना मागच्या आठवड्यातचं जामिनावर बाहेर आली होती.
‘गंदी बात’ (Gandi Baat ) या वेबसीरिजमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री अभिनेत्री गहना वशिष्ठला ( Gehana Vasisth ) हृदयविकाराचा झटका आल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गहनाला शनिवारी हृदयविकाराचा धक्का आला. मात्र आज ही माहिती उघड झाली. तिची प्रकृती गंभीर असल्याचे कळतेय. (Gandi Baat fame actress Gehana Vasisth hospitalised from heart attack)
गहनावर पोर्न व्हिडीओ बनवण्याचा आणि तो इंटरनेटवर अपलोड करण्याचा आरोप आहे. याच संदर्भात तिला मडगाव पोलिसांनी अटक केली होती. ती गेल्या आठवड्यात जामीनावर बाहेर आली होती. यादरम्यान शनिवारी तिला हृदयविकाराचा झटका आला. याआधीसुद्धा तिला हृदयविकाराचा झटका आला होता.
गहनाचे खरे नाव वंदना तिवारी आहे. मॉडेलिंगमध्ये आल्यानंतर तिने आपले नाव बदलून गहना वशिष्ठ केले. तिचे मित्र तिला जिंदगी नावानेही ओळखतात. कम्प्युटर सायन्समध्ये बीटेक केलेल्या गहनाला कॉलेजमध्ये असताना मॉडेलिंगच्या ऑफर मिळू लागल्या आणि ती मॉडेलिंगकडे वळली.
तिने आतापर्यंत अनेक जाहिरातींमध्ये काम केलं आहे. एकता कपूरच्या ‘गंदी बात’ या वेबसीरिजमध्ये तिने काम केले आहे. ‘बहनें’ या मालिकेत ती लीड रोलमध्ये दिसली होती. ‘फिल्मी दुनिया’ या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. काही तेलगू सिनेमातही ती झळकली आहे.
22 नोव्हेंबर 2019 रोजी एका वेबसीरिजचे शूटींग करताना तिला अचानक हृदयविकाराचा धक्का आला होता. यानंतर तिला रूग्णालयात भरती करण्यात आले होते. अनेक दिवस रूग्णालयात राहिल्यानंतर तिने पुन्हा वापसी केली होती.
म्हणून झाली होती अटक
गहनावर पोर्न व्हिडीओ बनवण्याचा आणि तो इंटरनेटवर अपलोड करण्याचा आरोप आहे. याच संदर्भात तिला मडगाव पोलिसांनी अटक केली होती. स्ट्रगलिंग अॅक्टर्सला पैशाचे आमीष दाखवून गहना पॉर्न व्हिडीओ शूट करायची, असे पोलिस चौकशीत स्पष्ट झाले आहे. एका अॅक्टर्सला या शूटच्या बदल्यात ती 20 हजार रुपए द्यायची आणि याबदल्यात गहनाला स्वत:ही मोबदला मिळायचा.