Ganeshostav 2022: यंदाच्या गणेशोत्सवात पाहायला मिळाला 'पुष्पा' फिव्हर, अल्लू अर्जुनच्या स्टाईलचे बाप्पाही झाले फॅन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 05:05 PM2022-08-30T17:05:07+5:302022-08-30T17:05:41+5:30
Ganeshostav 2022: बाप्पाच्या मूर्तींवरही पुष्पाची स्टाईल दिसू लागली आहे.
Ganeshostav 2022:पुष्पा: द राइज (Pushpa: The Rise) रिलीज झाल्यापासून स्टायलिश स्टार अल्लू अर्जुन(Allu Arjun)ची खूप क्रेझ प्रेक्षकांमध्ये पाहायला मिळत आहे. या चित्रपटात, त्याच्या बोलण्याच्या शैलीपासून त्याच्या डान्स शैलीपर्यंत, चाहत्यांनी भरपूर कॉपी केले जे सर्वत्र ट्रेंड करू लागले. पुष्पा द राइजची चाहत्यांमधील क्रेझ संपत नाहीये. अशा स्थितीत आता गणपती उत्सव अगदी जवळ आल्याने बाप्पाच्या मूर्तींवरही पुष्पाची स्टाईल दिसू लागली आहे.
तसे, गणेशोत्सव हा असाच सण आहे जो लोकांमध्ये पूर्ण उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. यावेळी लोक ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाचे स्वागत करतात, मात्र यावेळी पुष्पराज स्टाईलमध्ये बाप्पाच्या मूर्ती दाखल झाल्याने बाप्पाला घरी आणण्याचा उत्साह वेगळ्याच पातळीवर पाहायला मिळाला. काही ठिकाणी प्रसिद्ध पुष्पराज शैलीतील गणपतीच्या मूर्ती विराजमान झालेल्या दिसल्या.
अल्लू अर्जुनच्या क्रेझचे आणि स्टारडमचे हे जिवंत उदाहरण आहे, जे चित्रपट प्रदर्शित होऊन एवढ्या मोठ्या कालावधीनंतरही संपताना दिसत नाही आणि स्टारच्या प्रसिद्धीची नवीन उदाहरणे सादर करत आहे. या वर्षाच्या सुरुवातीला पुष्पाच्या यशानंतर, अभिनेत्याला बॉलिवूडपासून ब्रँड्सपर्यंत सर्वत्र नवीन ऑफर येत आहेत. अशा परिस्थितीत आता जर त्याच्या हॉलिवूड पदार्पणाची बातमी खरी ठरली तर ती २०२२ ची सर्वात मोठी बातमी ठरेल.