'काळवीट शिकारप्रकरणी सलमानने माफी मागावी नाहीतर...', गॅंगस्टर लॉरेन्स बिष्णोईची तुरुंगातून धमकी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2023 11:51 AM2023-03-15T11:51:51+5:302023-03-15T11:54:27+5:30

काळवीट शिकारप्रकरणी आमच्या समाजाची माफी मागावी नाहीतर....

gangster lawrence bishnoi threatens Salman khan says he should apologize in blackbuck poaching case | 'काळवीट शिकारप्रकरणी सलमानने माफी मागावी नाहीतर...', गॅंगस्टर लॉरेन्स बिष्णोईची तुरुंगातून धमकी

'काळवीट शिकारप्रकरणी सलमानने माफी मागावी नाहीतर...', गॅंगस्टर लॉरेन्स बिष्णोईची तुरुंगातून धमकी

googlenewsNext

पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येप्रकरणी तुरुंगात असणाऱ्या गॅंगस्टर लॉरेन्स बिष्णोईने (Lawrence Bishnoi) थेट तुरुंगातूनच अभिनेता सलमान खानला (Salman Khan) धमकी दिली आहे. काळवीट शिकारप्रकरणी आमच्या समाजाची माफी मागावी नाहीतर आमच्या भाषेत उत्तर देऊ अशा शब्दात त्याने दबंग अभिनेत्याला इशारा दिला आहे. एका वृत्तवाहिनीने तुरुंगातून त्याची मुलाखत घेतली असता यामध्ये त्याने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

गॅंगस्टर लॉरेन्स बिष्णोई याने याआधी अनेक मार्गांनी सलमान खानला धमकी दिली आहे. यामुळे सलमानच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली. पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्याकांड प्रकरणी बिष्णोई तुरुंगात आहे. एबीपी न्यूजने घेतलेल्या मुलाखतीत लॉरेन्सला सलमान खानला धमकी देण्याबाबत विचारण्यात आले. तेव्हा बिष्णोई म्हणाला, आमच्या समाजाचा सलमानवर प्रचंड राग आहे. आमच्या भागाच आम्ही झाडंही तोडू देत नाही त्याने तर प्राण्याची शिकार केली आहे. यासाठी त्याला आमच्या समाजाची माफी मागावीच लागेल. बिकानेरच्या पुढे आमच्या समाजाचं एक मंदिर आहे तिथे येऊन त्याला माफी मागावी लागेल. जर त्याने माफी मागितली नाही तर त्याला आमच्या शब्दात उत्तर दिलं जाईल.'

सतीश कौशिक यांना अखेरचा निरोप, सलमान खानला अश्रू अनावर; Video व्हायरल

तसेच तो म्हणाला, 'सलमानला आम्ही प्रसिद्धीसाठी किंवा पैशांसाठी धमकी देत नाहीए. असंच असतं तर शाहरुखला मारलं असतं. सलमानने आमच्या समाजाचा अपमान केला आहे.' सलमानने माफी मागण्यासाठी नकार दिला तर त्याचा अहंकार मोडून काढू असंही तो म्हणाला. याशिवाय सलमानला कोणतीही  चिठ्ठी लिहिली नव्हतची त्यात माझा हात नाही असंही त्याने मुलाखतीत सांगितले.

Web Title: gangster lawrence bishnoi threatens Salman khan says he should apologize in blackbuck poaching case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.