Gangubai Kathiawadi Movie Review: आलियाचा दमदार अभिनय, जबदरस्त दिग्दर्शन आणि डायलॉग असलेला 'गंगूबाई काठियावाडी'

By संदीप आडनाईक | Published: February 26, 2022 10:44 AM2022-02-26T10:44:41+5:302022-02-26T10:47:10+5:30

पुष्पा’ या दाक्षिणात्य चित्रपटाने बॉलिवूडमध्ये आलेली मरगळ जशी झटकली, आणि मोठी कमाई केली, त्याला दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi Movie) या अस्सल बॉलिवूडपटाने जोरदार टक्कर दिली आहे असे म्हणता येईल.

Gangubai Kathiawadi Movie Review: Everything Alia Bhatt | Gangubai Kathiawadi Movie Review: आलियाचा दमदार अभिनय, जबदरस्त दिग्दर्शन आणि डायलॉग असलेला 'गंगूबाई काठियावाडी'

Gangubai Kathiawadi Movie Review: आलियाचा दमदार अभिनय, जबदरस्त दिग्दर्शन आणि डायलॉग असलेला 'गंगूबाई काठियावाडी'

googlenewsNext

 

कलाकार : आलिया भट, अजय देवगण, सीमा पाहवा, छाया कदम, विजय राझ

रेटिंग स्टार : साडेतीन स्टार

चित्रपट परिक्षण- संदीप आडनाईक 

पुष्पा’ या दाक्षिणात्य चित्रपटाने बॉलिवूडमध्ये आलेली मरगळ जशी झटकली, आणि मोठी कमाई केली, त्याला दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘गंगूबाई काठियावाडी’ (Gangubai Kathiawadi Movie) या अस्सल बॉलिवूडपटाने जोरदार टक्कर दिली आहे असे म्हणता येईल. 

एस. हुसैन झैदी आणि जेन बोर्जेस यांच्या मुंबईच्या माफिया क्वीन्स या बेस्टसेलर पुस्तकातील ‘द मॅट्रिआर्क ऑफ कामाठीपुरा’ या प्रकरणावर आधारित हा सिनेमा १९५० आणि १९६०च्या दशकात सेक्स वर्कर समुदायाच्या हक्कांसाठी लढणाऱ्या गंगूबाईची ही कथा. गुजरातमधील काठियावाड येथील १६ वर्षाची ही गंगा हरजीवन दास काठियावाडी. अभिनेत्री बनण्याचे तिचे स्वप्न आहे. प्रियकर रमणिकसोबत गंगा गुजरातहून मुंबईला पळून येते. अभिनेत्री बनण्याची स्वप्ने रमणिक दाखवतो आणि कामाठीपुरात १००० रुपयांना कोठीवर तिला विकतो. गंगा रडते, मार खाते आणि अखेर मोडून पडते. शेवटी सेक्स वर्करचे आयुष्य स्वीकारते आणि त्या व्यवसायाचा भाग बनते. इतकी की या कामाठीपुरावर राज्य करण्याचा निर्धार करते. कामाठीपुरात ज्याचा धाक आहे, आणि त्याचा शब्द खाली पडू दिला जात नाही तो रहीम लाला तिच्या आयुष्यात येतो आणि गंगुबाई बनून गंगा कामाठीपुरावर राज्य करते. सेक्स वर्कर्सना सन्मान मिळावा आणि त्यांच्या कायदेशीर हक्कांसाठी मग गंगूबाई दीर्घकाळ लढा देते.  

यात काही संशय नाही की, आलिया भटने या भूमिकेसाठी आपला जीव ओतला आहे. आवाजातील चढउतार, बॉडी लँग्वेज यातून तिने यासाठी केलेले परिश्रम लक्षात येतात. आलियाने दमदार आवाजात जी संवादफेक केली आहे, ती वाखाणण्याजोगी आहे. भूमिकेचे बेअरिंग आलियाने ज्या प्रकारे घेतले आहे ते पाहता ही भूमिका तिने अक्षरशः जगली आहे. गंगूबाईच्या वेदना, एकटेपणा, तिच्या भावना, चपळपणा आणि परिपक्वता आलियाने तीव्रतेने परिपक्वपणे मांडलेले आहे. 

अजय देवगण या सिनेमात गंगूबाईचा गॉडफादर रहीम लालाच्या छोट्याश्या भूमिकेत जोरदार आणि संयत अभिनय केला आहे. सिनेमात त्याच्या लोकप्रियतेचा फायदा घेत जोरदार एंट्री ठेवलेली आहे. संजय लीला भन्साळीच्या आधीच्या लज्जा सिनेमातही त्याने याच प्रकारची कॅमिओ भूमिका केली होती, त्याची आठवण येथे नक्की येते. 

आलियाशिवाय कामाठीपुरातील महिलाही तितक्याच ताकदीने दिग्दर्शकाने मांडल्या आहेत. यात शीतल (सीमा पाहवा), रश्मी (छाया कदम) आणि रझिया (विजय राझ) यांचा परफॉर्मन्स जबरदस्त आहे. विशेषतः अभिनेत्री सीमा पाहवा यांचे शीलाबाईचे पात्र खास करून लक्षात राहते. छाया कदमची भीतीदायक रश्मी, गंगूबाईच्या विरोधात उभी असलेली ट्रान्सवुमन रझिया (विजय राझ)सारखी स्थानिक उग्र घरवाली, इंदिरा तिवारी यांच्या भूमिका सशक्त आहेत. राहुल व्होरा (जवाहरलाल नेहरू), शंतनू मिश्रा आणि इतर सहकलाकारांचा अभिनयही जबरदस्त आहे. हा सिनेमा जसा आलिया भटच्या अभिनयासाठी आहे तसा तो दिग्दर्शक संजय लीला भन्साळीचा सुद्धा आहे.

प्रकाश कपाडिया आणि उत्कर्षिणी वशिष्ठ यांनी आलियासाठी लिहिलेले वनलाईन संवाद जबरदस्त आहेत. विशेषतः आझाद मैदानात आलिया जे भाषण देते, ते लक्ष वेधून घेणारे आहे. रोज अनेक महिलांचा व्यापार ज्या कामाठीपुरात होतो तिथे ती प्रत्येक वेळी जेव्हा ‘अरे राजा’ म्हणते, तेव्हा तिच्यातील मातृप्रवृत्ती स्पष्ट होते. ‘आओ कभी हमारे कोठे पर. जवानी भी मिलेगी. कहानी भी मिलेगी,’ असे एका पत्रकाराला (जिम सरभ) चिडवताना गंगूबाई तोंडी असलेला संवाद टाळ्या घेतो. ‘गंगूबाई फिल्म में काम करने मुंबई आई थी लेकिन सोचा नहीं था पुरा सिनेमा बन जाएगी’, असा संवादसुद्धा तिच्याभोवतीचे वलय स्पष्ट करतो. सिनेमात वस्तुस्थितीला धरून अनेक प्रसंग पेरलेले आहेत. यात ती देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनाही भेटून वस्तीतील समस्या सोडवण्याचा प्रयत्न मांडलेला आहे. 


त्याच्या ट्रेडमार्क शैलीत भन्साळी गंगूबाईच्या कथेत अनेकदा नाट्य आणताना जाणवतो. कामाठीपुरातील विस्कळीत चौक, तेथील भिंती, महिलांच्या भडक रांगांनी भरलेल्या तेथील गल्ल्यांचे सुंदर चित्रण सिनेमॅटोग्राफर सुदीप चॅटर्जी यांनी केले आहे. जुने पोस्टर्स, जुनी गाणी, इराणी हॉटेल, मोडकळीस आलेले थिएटर्स आणि व्हिंटेज पोस्टकार्ड्स यामधून कामाठीपुरातील रोजचं जगणं अतिशय सूक्ष्मपणे चितारलेले आहे.  चित्रपटातील गाण्यांना चांगले संगीत दिल्याबद्दल संजय लीला भन्साळी यांचे कौतुक करावे लागेल.

Web Title: Gangubai Kathiawadi Movie Review: Everything Alia Bhatt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.