Gangubai Kathiawadi Review : 'गंगूबाई काठियावाडी' दमदार महिलेची शानदार कहाणी, वाचा Review

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 11:22 AM2022-02-25T11:22:33+5:302022-02-25T11:49:18+5:30

गंगूबाईचे जीवन अधिक जवळून जाणून घेण्यासाठी तुम्ही आलिया (Alia Bhatt)चा हा चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल, तर त्याआधी हा रिव्ह्यू वाचा

Gangubai kathiawadi movie review starrer alia bhatt and ajay devgn in lead role | Gangubai Kathiawadi Review : 'गंगूबाई काठियावाडी' दमदार महिलेची शानदार कहाणी, वाचा Review

Gangubai Kathiawadi Review : 'गंगूबाई काठियावाडी' दमदार महिलेची शानदार कहाणी, वाचा Review

googlenewsNext

संजय लीला भन्साळीं  (Sanjay Leela Bhansali)जेव्हा त्याचा सिनेमा पडद्यावर घेऊन येतात तेव्हा त्यांच्या चित्रपटांकडून खूप अपेक्षा असतात. यावेळीही प्रेक्षकांना त्यांच्या 'गंगुबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) या चित्रपटाकडून मोठ्या आशा आहेत. या चित्रपटाची कथा कामाठीपुरातील गंगूबाईच्या जीवनावर आधारित आहे, जिला एकदा तिच्या प्रियकराने किंवा पतीने केवळ 1000 रुपयांना विकले होते आणि नंतर ती सेक्स वर्कर बनली होती. या चित्रपटात आलिया भट (Alia Bhatt) ने गंगूबाईची भूमिका साकारली होती. त्याच वेळी, अजय देवगण (Ajay Devgn) गंगूबाईचा भाऊ असलेल्या रहीम लालाच्या भूमिकेत दिसला आहे. मात्र, चित्रपटात डॉन करीम लालाचे नाव बदलून रहीम लाला करण्यात आले आहे.

हा चित्रपट आज  थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. गंगूबाईचे जीवन अधिक जवळून जाणून घेण्यासाठी तुम्ही आलियाचा हा चित्रपट पाहण्याचा विचार करत असाल, तर त्याआधी हा रिव्ह्यू वाचा, त्यानंतर तुम्ही हा सिनेमा पाहायचा कि नाही ते ठरवा. 

सिनेमाची कथा 
गुजरातमधील काठियावाडमध्ये वाढलेल्या गंगा हरजीवन दास काठियावाडीची ही गोष्ट आहे. गंगाचे वडील बॅरिस्टर आहेत. गंगा चांगल्या कुटुंबातली. मात्र, वयाच्या १६ व्या वर्षी गंगा प्रेमात पडते. तेही वडिलांसोबत काम करणाऱ्या रमणिकसोबत. नववीपर्यंत शिकलेली गंगा एक दिवस अभिनेत्री बनण्याचे तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रमणिकसोबत गुजरातहून मुंबईला पळून जाते. रमणिकच तिला मुंबईत अभिनेत्री बनण्याची स्वप्ने दाखवतो आणि तिला आपल्या प्रेमात अडकवून मुंबईत आणतो. येथे तो कामाठीपुराच्या त्या गल्ल्यांमध्ये फक्त 1000 रुपयांसाठी विकतो, जिथे दररोज अनेक महिलांचा व्यापार होतो.

सुरुवातीला गंगा ती विकली गेली हे सत्य स्वीकारायला तयार नाही, पण परिस्थितीशी तडजोड करून ती कामाठीपुराची सेक्स वर्कर गंगू बनते आणि नंतर गंगू ते गंगूबाई बनते. डॉन करीम लाला जेव्हा तिच्या आयुष्यात येतो तेव्हा गंगूचे आयुष्य बदलते.. गंगूबाई करीम लाला आपला भाऊ मानते आणि करीम लाला गंगूला आपली बहीण मानतो. गंगूबाई करीम लालाच्या आधारावर कामाठीपुरावर राज्य करते. सेक्स वर्कर्सना समाजात सन्मान मिळावा आणि त्यांच्या कायदेशीर हक्कांसाठी गंगूबाई दीर्घकाळ लढा देत आहेत. त्यासाठी ती देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनाही भेटते.

रिव्ह्यू
गंगूबाईवर जी कथा पुस्तकात लिहिली आहे आणि जी इंटरनेटवर आहे ती आपल्यात बरेच काही सांगून जाते. गंगूबाईची ती वेदनादायक गोष्ट मोठ्या पडद्यावर साकारण्यात संजय लीला भन्साळी अपयशी ठरले आहेत. खऱ्या व्यक्तिरेखेवर आधारित कथेचा जेवढा परिणाम व्हायला हवा, तेवढा संजय लीला भन्साळी या चित्रपटात दाखवू शकले नाहीत. गंगूबाईची कथा फक्त सांगितली गेली आहे, तीही हुसेन जैदीने आपल्या पुस्तकात लिहिली आहे. वास्तविक व्यक्तिरेखा असलेल्या व्यक्तीवर चित्रपट बनत असेल तर त्यावर संशोधन होणे अत्यंत गरजेचे आहे.

गंगूबाईचा गंगा ते गंगू हा प्रवास प्रभावीपणे मांडण्यासाठी फारसे संशोधन केले गेले नाही हा चित्रपटाचा सर्वात मोठा नेगेटीव्ह पाईंट आहे. निर्मात्यांना हवे असते तर ते गंगूबाईचे बालपण आणि तिचे कुटुंबाशी असलेले नाते देखील दाखवू शकला असता, ज्यामुळे गंगाने तिचे कुटुंब सोडण्याचा निर्णय कसा घेतला हे दाखवले असते तर सिनेमा थोडा आणखी प्रभावी झाला असता. गंगा पळून जाते ती कथेत लगेच येते, गंगा आणि रमणिक कसे एकमेकांच्या जवळ येतात हेही दाखवलेले नाही. गंगा आणि रमणिकची प्रेमकथा चांगल्या प्रकारे रंगवता आली असती.

यानंतर जेव्हा गंगा कामाठीपुरात पोहोचते, तेव्हा तिच्यासोबत काय-काय होतं हे चित्रपटातून गायब असल्याचंही पाहायला मिळालं. चित्रपटात छोट्या छोट्या गोष्टी होत्या ज्यावर काम करता आले असते. गंगूबाई आणि डॉन करीम लाला यांच्यातील नाते अधिक सुंदरपणे मांडता आले असते, पण यातही निर्माते अपयशी ठरले. सर्वात मोठ्या चित्रपटात कशाची कमतरता होती ती म्हणजे गंगूबाई, गंगा कोण होती, तिची वागणूक कशी होती, तिच्या आजूबाजूचे लोक तिच्याबद्दल काय विचार करतात, तिचे बालपण कसे होते हे आपल्याला खरोखरच कळू शकले नाही.

सिनेमा पहायचा कि नाही?
चित्रपटाचा आत्मा जर कोणी असेल तर ती आलिया भट आहे. आलिया भटला मोठ्या पडद्यावर पाहताच तिने गंगूबाईच्या पात्रासाठी खूप मेहनत घेतल्याचे स्पष्ट होते. आलिया भटने उत्तम अभिनय केला आहे. इतकंच नाही तर आलिया भटच्या आवाजातही बदल पाहायला मिळाला. तिचा दरारा दाखवण्यासाठी आलियाने दमदार आवाजात संवाद ज्या प्रकारे दिले आहेत, ते आश्चर्यकारक आहे. आलियाशिवाय सीमा पाहवा, विजय राज आणि शंतनू मिश्रा आणि इतर सहकलाकारांचा अभिनयही जबरदस्त आहे. मात्र, या सगळ्यांसमोर अजय देवगण थोडा फिका दिसत आहे.

दुसरीकडे दिग्दर्शनाबाबत बोलायचे झाले तर संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात मजा आली नाही. संजय लीला भन्साळी यांनी पहिल्यांदा बायोपिक बनवण्याचा प्रयत्न केला, पण त्यात ते अयशस्वी दिसले. हा चित्रपट प्रेक्षकांना खिळवून ठेवेल असे काही सांगता येत नाही. , मात्र, चित्रपटातील गाण्यांना चांगले संगीत दिल्याबद्दल संजय लीला भन्साळी यांचे कौतुक करावे लागेल. 

Web Title: Gangubai kathiawadi movie review starrer alia bhatt and ajay devgn in lead role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.