'लागबागचा राजा'च्या चरणी नतमस्तक झाला कार्तिक आर्यन, म्हणतो- "तो आला आणि..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2024 10:38 IST2024-09-08T10:37:45+5:302024-09-08T10:38:53+5:30
Lalbaugcha Raja 2024 : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन दरवर्षी न चुकता गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी बाप्पाचं दर्शन घेतो.

'लागबागचा राजा'च्या चरणी नतमस्तक झाला कार्तिक आर्यन, म्हणतो- "तो आला आणि..."
सध्या राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह पाहायला मिळत आहे. घरोघरी गणरायाचं आगमन झालं आहे. लाडक्या बाप्पाच्या आगमनाने मुंबईतील लालबाग नगरीही गणरायाच्या जयघोषात दुमदुमली आहे. प्रसिद्ध अशा लालबागचा राजाचं दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करताना दिसतात. तर अनेक सेलिब्रिटीही दरवर्षी लालबागचा राजाच्या दर्शनासाठी जातात. बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन दरवर्षी न चुकता गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवशी बाप्पाचं दर्शन घेतो.
यंदाही कार्तिक आर्यनने ही परंपरा कायम ठेवली. पहिल्याच दिवशी लाडक्या लालबागचा राजाच्या चरणी कार्तिक आर्यन नतमस्तक झाला. कार्तिकने मुंबईतील लालबागचा राजाचं दर्शन घेतलं. याचे फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहेत. लालबागचा राजाचं दर्शन झाल्यानंतरचा आनंद कार्तिकच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. "तो परत आला आणि मी त्याचे आशीर्वाद घेण्यासाठी आलो...आता मोदक पार्टी...गणपती बाप्पा मोरया", असं कॅप्शन त्याने या पोस्टला दिलं आहे.
दरम्यान, कार्तिक आर्यनने 'प्यार का पंचनामा' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये कार्तिक दिसला. 'सोनू के टिटू की स्विटी', 'सत्यप्रेम की कथा', 'पती पत्नी और वो', 'लुका छुपी 'अशा सिनेमांमध्ये त्याने काम केलं आहे. अलिकडेच त्याचा चंदु चॅम्पियन सिनेमा प्रदर्शित झाला. सध्या कार्तिक 'भुलभुलैया ३' मुळे चर्चेत आहे.