'इस्लामचे सौंदर्य समजून घेण्याची लायकी नाही'; गौहर खानने नाव न घेता राखीला फटकारले
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2023 07:13 PM2023-09-03T19:13:22+5:302023-09-03T19:20:18+5:30
अभिनेत्री गौहर खानने राखी सावंतवर प्रसिद्धी स्टंट म्हणून धार्मिक गोष्टींचा वापर केल्याचा आरोप केला.
ड्रामा क्वीन राखी सावंत ही सध्या तूफान चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच राखी आपल्या आयुष्यामधील पहिला उमराह करून भारतामध्ये दाखल झाली. राखी सावंतने मक्का येथील अनेक व्हिडिओ आणि फोटो हे सोशल मीडियावर शेअर केले. नुकतेच एका कार्यक्रमामध्ये राखी सावंत ही अबाया घालून पोहचली. प्रसिद्धी स्टंट म्हणून धार्मिक गोष्टींचा वापर केल्याचा आरोप अभिनेत्री गौहर खानने अप्रत्यक्षपणे राखी सावंतवर केला आहे.
गौहर खानने आपल्या सोशल मीडियावर कतारमधील एका धर्मादाय संस्थेने 20 अनाथांना उमराहसाठी कसे पाठवले याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. याशिवाय गौहरने थेट नाव न घेता राखीला फटकारले.
गौहरने पोस्टमध्ये लिहलं की," अबाया घातल्याने कोणी मुस्लिम होत नाही. इस्लामचे सौंदर्य समजून घेण्याच्या लायकीचे काही लोक नाहीत. विश्वास हा हृदयात असतो. यासाठी कॅमेऱ्यांची गरज नसते. भारत किंवा सौदीतील इस्लाम बोर्डाने प्रसिद्धी स्टंटवर कठोर कारवाई करावी, जेणेकरून लोक एखाद्या पवित्र गोष्टीचा गैरफायदा घेऊ शकणार नाहीत.
गौहर खानच्या पोस्टचे नेटकऱ्यांनी समर्थन केले आहे. राखीबद्दल एका यूजरने लिहिले की, "राखीचा हा एक संपूर्ण पब्लिसिटी स्टंट आहे... ती इस्लामचे नाव खराब करत आहे". तर दुसर्या यूजरने लिहिले, "राखी कधीही बदलणार नाही.. हा सर्व एक ड्रामा आहे."