गौहर खानने 10 दिवसांत कमी केलं 10 किलो वजन, बाळाच्या जन्मानंतर फ्लॉन्ट केली फिगर; ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते हैराण
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2023 12:10 IST2023-05-25T12:04:50+5:302023-05-25T12:10:07+5:30
डिलीव्हरी अवघ्या १० दिवसांत तिने १० किलो कमी केलंय. तिचे ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते हैराण झालेत.

गौहर खानने 10 दिवसांत कमी केलं 10 किलो वजन, बाळाच्या जन्मानंतर फ्लॉन्ट केली फिगर; ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते हैराण
टीव्ही आणि बॉलिवूड अभिनेत्री गौहर खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. 10 दिवसांपूर्वीच तिने गोंडस बाळाला जन्म दिला आई आहे. त्यांनतर अवघ्या 10 दिवसांत तिने 10 किलो वजन कमी केले आहे. तिचे लेटेस्ट फोटो शेअर करत आपली कर्वी फिगर फ्लॉन्ट केली आहे. गौहरचे हे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतायेत. तिचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते हैराण झालेत.
गौहर खानने नुकताच एका बाळाला जन्म दिला. डिलीव्हरच्या अवघ्या 10 दिवसांत तिने 10 किलो वजन कमी केले आहे. बुधवारी गौहरने इंस्टाग्राम स्टोरीवर एक बूमरँग व्हिडिओ टाकला. यामध्ये ती नाइटसूटमध्ये दिसत असून ती खूपच स्लिम दिसत आहे. तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, 'आता मला आणखी 6 किलो कमी करावे लागेल.
गौहर आणि तिचा पती जैद दरबार यांनी 10 मे रोजी त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले. 25 डिसेंबर 2020 रोजी गौहर आणि जैदचे लग्न झाले. गौहर आणि जैदची लव्हस्टोरी खूपच इंटरेस्टिंग आहे. लॉकडाऊन दरम्यान घरातील ग्रॉसरी खरेदी करताना दोघे एका दुकानात भेटले होते. गौहरने जैदला स्टोअरमध्ये पाहिले नाही. यानंतर जैदने गौहरला इन्स्टाग्रामवर मेसेज केला आणि दोघेही बोलू लागले. हळूहळू मैत्री झाली आणि तिचे रुपांतर प्रेमात झाले. लग्नाच्या दोन वर्षानंतर त्यांनी आपल्या पहिल्या बाळाचं स्वागत केलंय.
गौहर खान हे बॉलिवूडमधील प्रसिद्ध नाव आहे. 'इशकजादे', 'रॉकेट सिंग', 'बेगम जान', 'तांडव', 'बेस्टसेलर', 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई', 'बद्रीनाथ की दुल्हनिया' यासह अनेक लोकप्रिय चित्रपट आणि वेब सिरीज आहेत. 'गेम' सारख्या चित्रपटात तिनं आपल्या दमदार अभिनयाची झलक दाखवली आहे. गौहर खानने छोट्या पडद्यापासून मोठ्या पडद्यावर आपले अभिनय कौशल्य दाखवले आहे.