गौहरला लेकाचा वाढदिवस करणं भोवलं, BMC अधिकाऱ्यांची कारवाई, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2024 14:01 IST2024-05-10T14:00:28+5:302024-05-10T14:01:00+5:30
कल्पना करा की, तुमच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन सुरु आहे. आणि इतक्यात bmc अधिकारी तुमच्यावर कारवाई करण्यासाठी आले. असंच काहीसं गौहर खानच्या लेकाच्या वाढदिवशी घडलंय (gauhar khan)

गौहरला लेकाचा वाढदिवस करणं भोवलं, BMC अधिकाऱ्यांची कारवाई, नेमकं काय घडलं?
बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे गौहर खान. गौहर ही अभिनेत्री आहेच शिवाय मॉडेल आणि डान्सरसुद्धा आहे. गौहर सोशल मीडियावर कायम सक्रीय असते. गौहर तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलचे विविध अपडेट्स सोशल मीडियावर शेअर करत असते. गौहरला नुकत्याच एका प्रसंगाला सामोरं जावं लागलं. गौहरने तिचा लेक जेहानच्या वाढदिवसासाठी शानदार थीम पार्टीचं आयोजन केलं होतं. पण या आयोजनावर BMC अधिकाऱ्यांनी कारवाई केली. असं काय घडलं?
झालं असं की... गौहर आणि तिचा पती जैद दरबार या दोघांनी गुरुवारी त्यांचा मुलगा जेहानचा वाढदिवस साजरा केला होता. या वाढदिवसासाठी शानदार जंगल थीम ठेवण्यात आली होती. त्यासाठी आकर्षक सजावट करण्यात आली होती. जेहानचा पहिला वाढदिवस होता. पण या पार्टीमध्ये गडबड झाली जेव्हा BMC अधिकाऱ्यांची एन्ट्री झाली. पार्टीच्या प्रवेशद्वारावर अनधिकृत सजावट करण्यात आली होती. ती BMC अधिकाऱ्यांनी हटवली.
या पार्टीचा व्हिडीओ समोर आलाय. व्हिडीओत पाहायला मिळतं की.. BMC अधिकारी जेहानच्या वाढदिवसाची सजावट तोडताना दिसत आहे. BMC अधिकारी गौहरची टीम आणि पार्टीचे आयोजक यांच्यात वादविवाद झालेला दिसतोय. अखेर BMC अधिकाऱ्यांनी हॉलबाहेर केलेली सजावट हटवली. अशाप्रकारे आतमध्ये गौहर तिच्या मुलाच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करत होती. तर बाहेर BMC अधिकारी कारवाई करत होते.