गौरी खाननं लेक Suhana Khanला डेटिंगच्या बाबतीत दिला सल्ला, म्हणाली - 'एकावेळी दोन मुलांना...'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 12:42 PM2022-09-20T12:42:35+5:302022-09-20T12:43:20+5:30

Koffee With Karan Show : कॉफी विद करण शोच्या आगामी भागात शाहरूख खानची पत्नी गौरी खान पाहायला मिळणार आहे. यावेळी बरेच गॉसिप ऐकायला मिळणार आहे.

Gauri Khan gives advice to daughter Suhana Khan on dating, says - 'Two kids at a time...' | गौरी खाननं लेक Suhana Khanला डेटिंगच्या बाबतीत दिला सल्ला, म्हणाली - 'एकावेळी दोन मुलांना...'

गौरी खाननं लेक Suhana Khanला डेटिंगच्या बाबतीत दिला सल्ला, म्हणाली - 'एकावेळी दोन मुलांना...'

googlenewsNext

बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता करण जोहर(Karan Johar)चा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय रिएलिटी शो कॉफी विद करण(Koffee With Karan)मध्ये नुकतेच शाहरूख खान(Shahrukh Khan)ची पत्नी गौरी(Gauri Khan), चंकी पांडे(Chunky Panday)ची पत्नी भावना (Bhavana Panday) आणि संजय कपूर(Sanjay Kapoor)ची पत्नी महिप (Mahip Kapoor) यांनी हजेरी लावली होती. या शोचा आगामी व्हिडीओ करण जोहर(Karan Johar)ने शेअर केला आहे. या एपिसोडमधील महत्त्वाचं आकर्षण होती ती गौरी खान. कारण ती फारशी कोणत्या शोमध्ये पाहायला मिळत नाही. या भागात शाहरूख खानचा केमिओदेखील आहे, म्हणजे गौरी खान शोमध्ये त्याच्याशी फोनवरून संवाद साधताना दिसेल. इतकेच नाही तर करण गौरीला विचारणार आहे की ती डेटिंगच्या बाबतीत सुहाना (Suhana Khan) काय सल्ला देईल?, त्यावर ती मजेशीर उत्तर देताना दिसणार आहे.

कॉफी विद करण शोच्या आगामी भागात शाहरूख खानची पत्नी गौरी खान पाहुणी म्हणून येणार आहे. तसेच तिच्या मैत्रिणी महीप कपूर आणि भावना पांडेदेखील पाहायला मिळणार आहे. करण या तिघींसोबत गप्पा मारताना दिसणार आहे. करणने गौरीला विचारलं की, ती सुहानाला डेटिंगच्या बाबतीत काय सल्ला देशील? त्यावर गौरी म्हणाली की, एकावेळेला कधीच दोन मुलांना डेट करू नको. करणने महिपला विचारले की, कोणत्या अभिनेत्यासोबत जोडी बनवायला आवडेल?,  त्यावर ती म्हणाली की, हृतिक रोशनसोबत चांगली वाटेन. त्यावर करणनं तिची मस्करी केली.


करण जोहरने गौरीला विचारले की, तिच्या आणि शाहरूख खानच्या लव्हस्टोरीला कोणतं टायटल देशील. त्यावर गौरी खान म्हणाली की दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे. कारण त्यांचं लग्न सोप्पे नव्हते. करण तिन्ही पाहुणींना सेलिब्रेटी कॉल करायला सांगतो. त्यावर गौरी फोन लावत असते तेव्हा करण म्हणतो की जर शाहरूखनं फोन उचलला तर तिला ६ पॉइंट्स मिळतील. शाहरूख खान गौरीचा फोन उचलतो आणि करणला हाय म्हणतो.

या एपिसोडचा प्रोमो पाहून चाहते खूप उत्सुक झाले आहेत. जास्त लोकांना गौरी खान बद्दल जाणून घेण्याची उत्सुकता जास्त आहे.

Web Title: Gauri Khan gives advice to daughter Suhana Khan on dating, says - 'Two kids at a time...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.