शाहरुख खानच्या या सवयीमुळे गौरी खानला वाटते त्याची काळजी, पठाण अभिनेता म्हणाला- तू तर मला....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 12:27 PM2023-02-04T12:27:05+5:302023-02-04T12:34:03+5:30

शाहरुख खान सध्या त्याच्या कारकिर्दीतील आतापर्यंतचा सर्वात हिट चित्रपट पठाणच्या यशाचा आनंद घेतो आहे. याच दरम्यान त्याचा गौरी खानसोबतचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय.

Gauri khan upset with shah rukh khan sleeping habbits and call to concern husband health know reason | शाहरुख खानच्या या सवयीमुळे गौरी खानला वाटते त्याची काळजी, पठाण अभिनेता म्हणाला- तू तर मला....

शाहरुख खानच्या या सवयीमुळे गौरी खानला वाटते त्याची काळजी, पठाण अभिनेता म्हणाला- तू तर मला....

googlenewsNext

शाहरुख खान  (Shah Rukh Khan)आणि त्याची पत्नी गौरी खान हे बॉलिवूडमधील पॉवर कपलपैकी एक आहे. दोघांना एकत्र राहून जवळपास 31 वर्षे झाली आहेत. गेल्या काही वर्षांत दोघांनी एकमेकांना भक्कम साथ दिली आहे. दोघांना सुहाना खान, आर्यन खान आणि अवराम खान ही तीन मुले आहेत. 'पठाण'(Pathaan)च्या यशचा सध्या संपूर्ण खान कुटुंब आनंद घेतंय.  दरम्यान, शाहरुख खानचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये शाहरुख गौरीशी फोनवर बोलत आहे.

शाहरुख खान फोनवर त्याच्या झोपेची पद्धतीवर, आर्थिक संकट, वय आणि फोनवरच शॉपिंग थांबवण्याबद्दल बोलतो आहे. हा व्हिडिओ जवळपास 14 वर्षे जुना आहे. तेव्हा शाहरुख 44 वर्षांचा होता. त्यावेळीही शाहरुख बॉलिवूडचा टॉपचा अभिनेता होता. व्हायरल झालेला व्हिडिओ एका चित्रपटाच्या सेटचा आहे. सेटवर बसून शाहरुख गौरीशी बोलत आहे. करण जोहरही त्याच्या जवळ उभा आहे.

शाहरुख खान कॉलवर म्हणतो, “यार गौरी(Gauri Khan) तू हे सोडून देना… हे तुझ्यासाठी जास्त चांगलं आहे.  अनेक वर्षांपासून आपण माझ्या झोपण्याच्या पद्धतीबद्दल बोलत आहोत. तू आराम कर. मी एवढं तर करेन.. मी ४४ वर्षांचा आहे. मी सांभाळून घेईन." दरम्यान, करण जोहर काहीतरी म्हणतो.

शाहरुख खान पुन्हा कॉलवर म्हणतो, “करण म्हणतो की तुझी चिंता खोटी आहे. बघ तुला माझी आर्थिक परिस्थिती माहिती आहे. तू शॉपिंग बंद कर. शाहरुखच्या या व्हायरल व्हिडिओवर लोक कमेंट करत आहेत. त्यांनी गौरीच्या वागण्याचं कौतुक केलं. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, "शाहरुख सर, गौरी मॅम तुमच्याबद्दल खूप काळजी 
 करते.." दुसर्‍या युजरने लिहिले, "ती तुझ्यावर प्रेम करते."


 

Web Title: Gauri khan upset with shah rukh khan sleeping habbits and call to concern husband health know reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.