राम कपूरच्या हनीमूनचे unseen photos व्हायरल; पहिल्यांदाच दिसला इतक्या रोमॅण्टिक अंदाजात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2021 14:21 IST2021-09-14T14:19:18+5:302021-09-14T14:21:05+5:30
Ram Kapoor : अभिनेत्री गौतमीने त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. तिने पहिल्यांदाच राम आणि तिच्या हनीमुनचे फोटो शेअर केले आहेत.

राम कपूरच्या हनीमूनचे unseen photos व्हायरल; पहिल्यांदाच दिसला इतक्या रोमॅण्टिक अंदाजात
छोट्या पडद्यावरील अभिनेता राम कपूर याच्या लोकप्रियतेविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. उत्तम अभिनयशैली आणि नम्रपणा यामुळे रामने अनेकांची मन जिंकून घेतली आहेत. त्यामुळेच आज तो लोकप्रिय कलाकारांच्या यादीत अग्रस्थानावर आहे. विशेष म्हणजे रामला पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक कायमच उत्सुक असतात. मात्र, गेल्या काही काळापासून तो त्याच्या कुटुंबासोबत क्वालिटी टाइम व्यतीत करत आहे. यामध्येच त्याच्या पत्नीने अभिनेत्री गौतमीने त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. तिने पहिल्यांदाच राम आणि तिच्या हनीमुनचे फोटो शेअर केले आहेत.
अलिकडेच गौतमीने इन्स्टाग्रामवर त्यांच्या हनीमुनचे काही unseen photos शेअर केले आहेत. विशेष म्हणजे हे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून पहिल्यांदाच रामला एका नव्या रुपात प्रेक्षकांनी पाहिलं आहे. या फोटोमध्ये गौतमीचा बोल्ड अंदाज पाहायला मिळतोय. तर, रामदेखील प्रचंड फिट असल्याचं पाहायला मिळत आहे. “ते वर्ष होतं. २००३” असं कॅप्शन गौतमीने या फोटोला दिलं आहे.
दरम्यान, गौतमी आणि राम कपूर यांनी 'घर एक मंदिर' या मालिकेत एकत्र स्क्रीन शेअर केली होती. याच मालिकेमुळे त्यांच्यातील जवळीक वाढली आणि त्यांनी २००३ मध्ये लग्नगाठ बांधली. अलिकडेच त्यांच्या लग्नाला १८ वर्ष पूर्ण झाली आहेत. त्यामुळेच लग्नाच्या वाढदिवसानिमित्त गौतमीने हा हनीमुनचा अनसीन फोटो शेअर करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला.