शाहरुख खानसोबत बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले, पुरस्कारही जिंकला, पण पहिला चित्रपट शेवटचा ठरला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 11:21 AM2023-03-20T11:21:10+5:302023-03-20T11:25:23+5:30

स्वदेश' या देशभक्तीपर चित्रपटातून तिनं आपल्या सहज अभिनयाने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं केले. मात्र 'स्वदेश' हा तिचा पहिला आणि शेवटचा चित्रपट ठरला.

Gayatri joshi debut with shah rukh khan film swadesh got best newcomer award but left the industry | शाहरुख खानसोबत बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले, पुरस्कारही जिंकला, पण पहिला चित्रपट शेवटचा ठरला

शाहरुख खानसोबत बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले, पुरस्कारही जिंकला, पण पहिला चित्रपट शेवटचा ठरला

googlenewsNext

गायत्री जोशी(Gayatri Joshi)ने 2004 मध्ये शाहरुख खानसोबत 'स्वदेश' (Swades)चित्रपटातून पदार्पण केले. असे म्हटले जाते की ज्या चित्रपटांमध्ये शाहरुख मुख्य भूमिकेत आहे, त्या अभिनेत्रीला फारसे लक्ष दिले जात नाही, परंतु हे चुकीचे सिद्ध करून, नवोदित अभिनेत्री गायत्रीने केवळ तिच्या अभिनयाने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. एवढंच नाही तर सर्वोत्कृष्ट डेब्यू पुरस्कारासह अनेक पुरस्कारही जिंकले. आगामी काळात गायत्री ही बॉलिवूडची स्टार असेल असे मानले जात होते, मात्र गायत्रीने अचानक बॉलिवूडला रामराम ठोकत सर्वांनाच धक्का दिला. गायत्रीने असे का केले?

गायत्री जोशीने कॉलेजच्या दिवसांपासूनच मॉडेलिंगला सुरुवात केली होती. चित्रपटसृष्टीत येण्यापूर्वी तिने बॉम्बे डाईंग, सन सिल्क शैम्पू, एलजी, फिलिप्स, ह्युंदाई या ब्रँडसाठी मॉडेलिंग केले होते. 'स्वदेश' चित्रपटापूर्वीच गायत्री शाहरुख खानसोबत एका जाहिरातीत दिसली होती.


संसारात रमली गायत्री 
'लगान' या सुपरहिट चित्रपटानंतर आशुतोष गोवारीकर यांनी आणखी एका नव्या विषयावर देशभक्तीने भरलेला 'स्वदेश' चित्रपट तयार केला. या चित्रपटात शाहरुख खान मुख्य भूमिकेत होता आणि त्याच्यासोबत गायत्री जोशी होती.  गायत्रीचा सहज अभिनय प्रेक्षकांना आवडला, पण गायत्रीने अचानक 2005 साली उद्योगपती विकास ओबेरॉयशी लग्न केलं. यानंतर ती संसार रमली गायत्री दोन मुलांची आई आहे. 

विशेष म्हणजे जेव्हा आशुतोष गोवारीकरने 'स्वदेश'साठी शाहरुख खानशी संपर्क साधला तेव्हा चित्रपटाची कथा ऐकल्यानंतर तो म्हणाला की, चित्रपट चांगला आहे पण चालणार नाही. कारण या चित्रपटाचा आशय उत्तम होता पण सामान्य चित्रपटांसारखे हिट फॉर्म्युले नव्हते. मात्र, 'स्वदेश' करताना शाहरुख या चित्रपटाशी भावनिक जोडला गेला. . हा पहिला भारतीय चित्रपट आहे ज्यामध्ये नासा संशोधन केंद्राच्या आतील दृश्ये दाखवण्यात आली होती.


 

Web Title: Gayatri joshi debut with shah rukh khan film swadesh got best newcomer award but left the industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.