‘पाकिजा’ अभिनेत्री गीता कपूरचे निधन; वृद्धाश्रमातच घेतला अखेरचा श्वास!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2018 11:27 AM2018-05-26T11:27:47+5:302018-05-26T16:57:54+5:30

‘पाकिजा’ या चित्रपटात राजकुमार यांच्या दुसºया पत्नीची भूमिका साकारणाºया ज्येष्ठ अभिनेत्री गीता कपूर (वय ५७) यांनी शनिवारी या जगाचा ...

Geeta Kapur dies of 'Pakza' actress; The last breath took place in old age! | ‘पाकिजा’ अभिनेत्री गीता कपूरचे निधन; वृद्धाश्रमातच घेतला अखेरचा श्वास!

‘पाकिजा’ अभिनेत्री गीता कपूरचे निधन; वृद्धाश्रमातच घेतला अखेरचा श्वास!

googlenewsNext

‘पाकिजा’ या चित्रपटात राजकुमार यांच्या दुसºया पत्नीची भूमिका साकारणाºया ज्येष्ठ अभिनेत्री गीता कपूर (वय ५७) यांनी शनिवारी या जगाचा निरोप घेतला. उपलब्ध माहितीनुसार त्यांनी सकाळी ९ वाजेच्या दरम्यान वृद्धाश्रमातच अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची अधिकृत बातमी निर्माता अशोक पंडित यांनी त्यांच्या ट्विटर हॅण्डलवरून दिली. यावेळी त्यांनी गीता कपूर यांचा एक व्हिडीओ अपलोड केला. ज्यामध्ये त्यांचे शव बघावयास मिळत आहे. अशोक पंडित यांनी गीता कपूर यांच्या निधनाची बातमी सांगताना ट्विटमध्ये लिहिले की, ‘५७ वर्षीय गीता कपूर यांच्या पार्थिवाजवळ उभा आहे. ज्यांना एक वर्षापूर्वी त्यांच्याच मुलांनी एसआरव्ही हॉस्पिटलमध्ये बेवारस स्थितीत सोडले होते. ओल्ड एज होममध्ये (वृद्धाश्रम) त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. आम्ही त्यांची खूप काळजी घेण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलगा आणि मुलीची प्रतीक्षा त्यांना दरदिवसाला कमजोर करीत होती.  

अशोक यांनी पुढे लिहिले की, ‘गेल्या एक वर्षांपासून त्या आपल्या मुलांची प्रतीक्षा करीत होत्या. मात्र कोणीही त्यांना भेटण्यासाठी आले नाही. गेल्या शनिवारी त्यांच्या चेहºयावर हास्य फुलविण्यासाठी आम्ही एका ब्रेकफास्टचे आयोजन केले होते. त्यावेळी त्या ठीक दिसत होत्या, मात्र आनंदी नव्हत्या. त्यांना फक्त त्यांच्या मुलांना बघावयाचे होते. हीच अखेरची इच्छा सोबत घेऊन त्यांनी या जगाचा निरोप घेतला. 

After reports of being abandoned last year, Pakeezah actress Geeta Kapoor passes away

— Ashoke Pandit (@ashokepandit) May 26, 2018

दरम्यान, गीता कपूर यांनी शंभरपेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. मात्र त्यांना ‘पाकिजा’ या चित्रपटासाठी सर्वाधिक ओळखले जायचे. ‘पाकिजा’मध्ये गीता कपूर यांनी राजकुमारच्या दुसºया पत्नीची भूमिका साकारली होती, तर मीना कुमार या मुख्य भूमिकेत होत्या. उपलब्ध माहितीनुसार, गीता कपूर यांचा मुलगा राजा बॉलिवूड इंडस्ट्रीत कोरिओग्राफर म्हणून काम करतो, तर मुलगी पूजा एक एयर होस्टेस आहे. राजानेच गेल्यावर्षी गीता यांना रुग्णालयात बेवारस स्थितीत सोडले होते. तेव्हापासून तो एकदाही त्यांना भेटण्यासाठी गेला नाही. 

निर्माता अशोक पंडित आणि रमेश तोरानी हे गीता कपूर यांच्या मदतीसाठी धावून आले. त्यांनी त्यांच्या उपचाराच्या खर्चाची संपूर्ण जबाबदारी पेलली. अखेरच्या क्षणापर्यंत या दोघांनी त्यांचा सांभाळ केला. अखेरच्या क्षणीही हे दोघेच त्यांच्याजवळ असून, आतातरी त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी मुले येणार काय? असा प्रश्न अनेकांकडून उपस्थित केला जात आहे. 

Web Title: Geeta Kapur dies of 'Pakza' actress; The last breath took place in old age!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.